ETV Bharat / state

सूरजागडमध्ये स्टील प्रकल्पात स्थानिकांना रोजगार, गडचिरोलीत एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक - उदय सामंत - Surjagad Steel Project - SURJAGAD STEEL PROJECT

Uday Samant : गडचिरोली लोहखनिज प्रकल्पात स्थानिकांना प्राधान्यानं रोजगार दिला जाणार असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते आज सूरजागडमध्ये स्टील प्लांटच्या भूमिपूजनानंतर बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती होती.

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 17, 2024, 10:53 PM IST

नागपूर Uday Samant : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात 5 हजार कोटी रुपये खर्चून स्टील प्लांटची निर्मिती होणार आहे. आज या स्टील प्लांटच्या कामाचं भूमिपूजन राज्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थिती झालं. यावेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थिती होते. यावेळी सामंत म्हणाले. "हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं अत्यंत क्रांतिकारक प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रासाठीसुद्धा महत्त्वाचा प्रकल्प आहे. दावोस करारावर टीका होत होती. त्याला एक प्रकारचं उत्तर या प्रकल्पाच्या माध्यमातून मिळालं" असं ते म्हणाले. "गडचिरोलीची नक्षलग्रस्त जिल्हा अशी ओळख आता पुसली जाणार आहे. आता गडचिरोलीला उद्योग नगरी म्हणून नवीन ओळख प्राप्त होणार आहे. गडचिरोलीचा विकास व्हावा, यासाठी धर्मरावबाबा आत्राम यांचं मोठं योगदान" असल्याचं उदय सामंत म्हणाले आहेत.

उदय सामंत यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

उद्धव ठाकरेंची स्वबळाची चाचपणी : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा स्वतंत्र पक्ष आहे. त्यांनी कुणाशी आघाडी करावी, युती करावी त्यांचा प्रश्न आहे. आगामी निवडणूक स्वबळावर लढावी, असं उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये असू शकतं. त्यामुळं कदाचित ते चाचपणी करत असतील, असं सामंत यांनी सांगितलं.

स्थानिकांना रोजगार मिळेल : स्थानिकांना कंपन्यांमध्ये प्राधान्यानं काम देण्यात यावं, असा शासन निर्णय आहे. गडचिरोलीमध्ये ही 75 टक्के पेक्षा जास्त स्थानिक लोकांनाचं काम मिळेल. या प्रकल्पात दहा हजार कोटी रुपये खर्च होत आहे. त्यात ७५ टक्के पेक्षा जास्त स्थानिक लोक असतील.

विशाळगडाच्या मुद्यावरून राजकारण नको : विशालगडाच्या बाबतीत जाती-पातीचं राजकारण करण्यात अर्थ नाही. अनाधिकृत बांधकामामुळंच झालेला उद्रेक होता. निवडणुका आल्या म्हणून जातीपातीचं, धर्माचं राजकारण करून महाराष्ट्र भडकवण्याचं काम कोणी करू नये, असं सामंतांनी विरोधकांना सुनावलं.

अशी आहे लाडका भाऊ योजना : लाडका भाऊ ही योजना काही लोकांना माहितीचं नव्हती. अप्रेंटेनशिप बारावीनंतर ट्रेनिंग घ्यायचा असेल, तर 6 हजार रुपये, डिप्लोमानंतर 8 हजार, पदवीनंतर 10 हजार रुपये. अशी लाडका भाऊ योजना आहे.

चांगल्या नेत्याला संपण्याचं माविआचं काम : जयंत पाटलांनी आरोप केले आहे. त्या अनुषंगानं विधानसभेला दोन तीन महिने आहे. कोणी कोणी महायुतीला मतदान केलं, याचे पडसाद विधानसभ निवडणुकीत दिसतील. जयंत पाटील यांना मत फुटणार, असं डोळ्यासमोर दिसत होतं. एका चांगल्या राजकीय पक्षातील नेत्याला संपवण्याचं काम महाविकास आघाडीनं एकत्रितरीत्या केलं.

हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही : जातीपातीच्या विषयाला धरून वाद लागणं महाराष्ट्राच्या दृष्टीनं गंभीर बाब आहे. कालपर्यंत सगळे गुण्यागोविंदानं राहत होतो. मात्र जातीपातीचं आरक्षणाच्या राजकारणावरून जे काही घडत आहे, ते योग्य वाटत नाही. मराठा समाजाला 10 टक्के टिकणार आरक्षण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. दोन्ही समाजाला निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वाद लावताय, हे महाराष्ट्राच्या दृष्टीनं गंभीर असल्याचं टीका सामंतांनी विरोधकांवर केलीय.

हे वाचलंत का :

  1. देशातील 30 टक्के पोलाद उत्पादन गडचिरोलीतून होणार, उद्योगातून होणार वीस हजार रोजगार निर्माण - देवेंद्र फडणवीस - India steel production
  2. देवेंद्र फडणवीस -अजित पवारांचं हेलिकॉप्टर भरकटलं : अजित पवारांनी सांगितला थरारक अनुभव - Devendra Fadnavis

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.