ETV Bharat / state

लोकसभेची रणधुमाळी! अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडून 190 मुक्तचिन्हं घोषित; वाचा चिन्हांची नावं - Election Commission gave symbols - ELECTION COMMISSION GAVE SYMBOLS

Election Commission gave 190 free symbols : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उर्वरित टप्प्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने नोंदणीकृत पक्ष आणि अपक्षांसाठी 190 मुक्तचिन्हं जाहीर केली आहेत. यातील काही चिन्हं ही गमतीशीर सुद्धा आहेत, जाणून घेऊया काय आहे पक्ष आणि चिन्हांची स्थिती.

निवडणूक आयोगाकडून 190 मुक्तचिन्हं
निवडणूक आयोगाकडून 190 मुक्तचिन्हं
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 2, 2024, 6:59 PM IST

मुंबई : Election Commission gave 190 free symbols : देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचं बिगुल वाजलं असून, आता उमेदवारी अर्ज दाखल होत आहेत. देशातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. तर, यापुढे टप्पा निहाय उमेदवारी अर्ज दाखल होतील. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्ष आणि प्रादेशिक पक्षांसाठी निवडणूक चिन्हं ही कायम करण्यात आली आहेत. मात्र, अन्य नोंदणीकृत पक्ष आणि अपक्षांना मुक्तचिन्हं दिली जातात. यंदा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून 190 मुक्तचिन्हं प्रसारित करण्यात आली आहेत, अशी माहिती राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर यांनी दिली आहे.

Lok Sabha 2024 elections
अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाकडून 190 मुक्तचिन्हं घोषित

कोणते आहेत राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्ष : देशात सहा पक्षांना राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. (Lok Sabha 2024 elections) राष्ट्रीय पक्षांमध्ये आम आदमी पार्टी चिन्ह झाडू, बहुजन समाज पार्टी चिन्ह हत्ती, भारतीय जनता पार्टी चिन्ह कमळ, भारतीय कम्युनिस्ट पार्टी चिन्ह विळा हातोडा, काँग्रेस चिन्ह हाताचा पंजा आणि नॅशनल पीपल्स पार्टी चिन्ह पुस्तक यांचा समावेश आहे. तर राज्यातील प्रादेशिक पक्षांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना चिन्ह रेल्वे इंजिन, शिवसेना शिंदे गट चिन्ह धनुष्यबाण, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चिन्ह मशाल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चिन्ह घड्याळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस यांचा समावेश आहे.

देशातील एकूण पक्षांची संख्या किती : देशात एकूण पक्षांची संख्या ही 398 इतकी झाली आहे. यामध्ये राष्ट्रीय पक्ष ६, राज्यस्तरीय पक्ष ५, इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्ष 10 अन्य नोंदणीकृत पक्ष 377 असे एकूण 398 पक्ष असल्याची माहिती पारकर यांनी दिली आहे.

कोणती आहेत गंमतीशीर चिन्हे : निवडणूक आयोगाकडून (Election Commission) लोकसभा निवडणुकीसाठी अपक्ष आणि अन्य नोंदणीकृत पक्षांना देण्यात येणारी 190 चिन्हं, मुक्त चिन्हं म्हणून प्रसारित केली आहेत. गत निवडणुकीत या चिन्हांची संख्या 193 इतकी होती. निवडणूक आयोगाकडून प्रसारित करण्यात आलेल्या 190 चिन्हांमध्ये घरगुती वापराच्या वस्तू, फळे, कपडे यांचा समावेश आहे. मात्र, या 190 चिन्हांमध्ये काही चिन्हे ही अतिशय गमतीशीर आहेत. यामध्ये चॉकलेट, बूट, पाकीट, नरसाळे, बादली, फ्रॉक, हेडफोन, स्टेथोस्कोप, भाला फेकणारा माणूस, मनुष्य समूह, ड्रिल मशीन, सायकल पंप, आईस्क्रीम, स्टेपलर, कागद पंच मशीन, टूथ ब्रश, नेल कटर, सुईदोरा, सीसीटीव्ही कॅमेरा, लिफाफा, वाळूचे घड्याळ. बाज, शटर, रिमोट, इंजेक्शन, पायमोजे, कुलर, पेट्रोल पंप मशीन, ग्रामोफोन, क्रेन, दुर्बीण,कचरा पेटी, माऊस, फुगा, ब्रेड, या चिन्हांचा समावेश आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना याच चिन्हांचा आधार घ्यावा लागणार आहे.

हेही वाचा :

1 'आप'ला मोठा दिलासा! दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणात खासदार संजय सिंह यांना जामीन मंजूर - Granted Bail to AAP MP Sanjay Singh

2 नाराजी वाढत असताना एकनाथ शिंदेंचाही पत्ता कट झालेला दिसेल-संजय राऊत यांचा दावा - Sanjay Raut News

3 महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम, उदय सामंत घेणार गडकरी, फडणवीसांची भेट - Lok Sabha elections

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.