ETV Bharat / state

विधानसभा निवडणूक 2024 : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, कोणते मुद्दे राहिले चर्चेत? - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी (18 नोव्हेंबर) सायंकाळी सहानंतर थंडावल्या आहेत. निवडणुकीतील मुद्दे आणि नेत्यांच्या किती सभा चर्चेत झाल्या, हे जाणून घ्या.

Election campaign ended for Maharashtra Assembly Election 2024 Mahayuti Vs MVA Vs Independent candidates voting will be held on 20 November
प्रचाराच्या तोफा थंडावल्या (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 19, 2024, 8:08 AM IST

मुंबई : मागील महिनाभरापासून मुंबईसह राज्यभरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात निवडणूक प्रचाराची रणधुमाळी सुरू राहीली. प्रचारादरम्यान विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सामने रंगले. निवडणूक आयोगानं भरारी पथकांच्या माध्यमातून करोडो रुपयांची रोख, मौल्यवान वस्तू जप्त केल्या. दरम्यान, प्रचार सभा, चौक सभा, रोड शो, पदयात्रा, बाईक रॅली या सर्वांनी दणाणून गेलेला प्रचार थंडावलाय.

राजकीय पक्षांकडून जाहीर प्रचार होत नसला तरी गुप्तपणे भेटीगाठी आणि बैठका घेऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू राहणार आहेत. मतदानासाठी अवघे काही तास शिल्लक असताना मतदारांना मतदान करण्यासाठी आमिष दाखवून पैसे किंवा भेटवस्तू देण्याचे प्रकार घडू शकतात. यामुळं सर्व उमेदवारांवर निवडणूक आयोगाची करडी नजर असणार आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळ प्रचारात : महायुती असो किंवा महाविकास आघाडी दोन्ही बाजूच्या स्टार प्रचारकांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा आणि रोड शो घेतले. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चव्हाण आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी सभा घेतल्या आहेत. याचबरोबर केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय मंत्री चिराग पासवान, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांच्यासह भाजपाच्या अनेक नेत्यांनी राज्यात सभा घेतल्या आहेत. यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पूर्ण राज्यात सभांचा धडाका लावला.

'बटेंगे तो कटेंगे' मुद्द्यावरून उडाले खटके : महायुतीनं प्रचाराच्या सुरुवातीच्या काळात विकासकामांच्या मुद्द्यावर जनतेचं लक्ष वळवलं. मात्र, त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे' या मुद्द्यावरुन महायुतीमध्येच खटके उडू लागले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा, 'एक है तो सेफ आहे' हा मुद्दा देखील शेवटपर्यंत चर्चेत राहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचारात विकास कामांच्या मुद्द्यासोबत पंतप्रधानांवर स्तुतीसुमने उधळली. तर उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हल्लाबोल केला. दुसरीकडं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रचार सभांमध्ये काका शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.

राहुल गांधी यांच्या राज्यात 7 सभा : काँग्रेसचे समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या राज्यात 8 सभा तर 4 पत्रकार परिषद झाल्या आहेत. याबरोबर लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या राज्यात 7 सभा आणि मुंबईत 1 पत्रकार परिषद झाली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्या 3 सभा आणि 1 रोड शो झाला. याचबरोबर तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, काँग्रेस नेते सचिन पायलट यांनीदेखील महाविकास आघाडीच्या प्रचारात सहभाग घेतला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यभर प्रचार सभा घेत प्रचाराचा धुरळा उडवला.

4,136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात : निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार 15 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबरपर्यंत राज्यात 'सी व्हिजील ॲप'वर एकूण 8 हजार 678 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी 8 हजार 668 तक्रारी या निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर यादरम्यान राज्यात एकूण 660 कोटी 16 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहितीसुद्धा निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 20 नोव्हेंबरला राज्यातील विधानसभेच्या एकूण 288 मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 4,136 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यापैकी 3,771 पुरुष, 363 महिला तर 2 ट्रान्सजेंडर आहेत.

हेही वाचा -

  1. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंची शेवटची पत्रकार परिषद; राहुल गांधींसह उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
  2. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस, संध्याकाळी नेत्यांच्या तोफा थंडावणार
  3. "शिंदे, पवार, फडणवीसांना एकदा तेलंगणात..."; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं पंतप्रधान मोदींना ओपन चॅलेंज

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.