ETV Bharat / state

शिवसेनेची पहिली यादी जाहीर; राधानगरी, करवीरमध्ये उमेदवार, मात्र उत्तरचा सस्पेन्स कायम - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत प्रकाश आबिटकर यांना तर करवीर विधानसभा मतदारसंघातून चंद्रदीप नरके यांना उमेदवारी देण्यात आली.

Maharashtra Assembly Election 2024
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 23, 2024, 9:01 AM IST

कोल्हापूर : राज्यात सध्या निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपानं पहिल्यांदा 99 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानंतर आता शिवसेनेनं देखील त्यांच्या पाठोपाठ आपल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून राधानगरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर यांना तर करवीर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर भाजपा शिवसेना दोघांचाही दावा असल्यानं उत्तरचा सस्पेन्स अद्याप देखील कायम आहे.

Maharashtra Assembly Election 2024
आमदार प्रकाश आबिटकर (Reporter)

ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या दोघांना उमेदवारी : राज्यात गेल्या पाच वर्षात झालेल्या राजकीय भूकंपानंतर शिवसेना दोन गटात विभागली गेली. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत वेगळा गट स्थापन केला आणि भाजपासोबत सत्तेत सहभागी झाले. यादरम्यान अनेक विद्यमान आमदार आणि नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातून राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर, करवीरचे माजी आमदार चंद्रदीप नरके आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी देखील शिंदेंची साथ धरली. गेल्या अडीच वर्षात झालेल्या या अनेक नाट्यमय घडामोडीनंतर 2024 ची विधानसभा निवडणूक पार पडत आहे. एकनाथ शिंदे यांनी पहिल्या 45 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्ये आबिटकर आणि चंद्रदीप नरके यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Maharashtra Assembly Election 2024
राजेश क्षीरसागर (Reporter)

उत्तरचा सस्पेन्स वाढला, राजेश क्षीरसागर वेटिंगवर : बहुतांश शहरी भाग असलेला कोल्हापूर उत्तर मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघातून राजेश क्षीरसागर दोन वेळा आमदार राहिले. मात्र 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसनं या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत हा किल्ला ताब्यात घेतला. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव आमदार झाले, मात्र कोरोना काळात त्यांचं निधन झालं. त्यानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत ही जागा महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसला गेल्यानं राजेश क्षीरसागर यांना थांबावं लागलं. चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विरोधात भाजपाच्या वतीनं सत्यजित कदम यांनी निवडणूक लढवली. मात्र जयश्री जाधव विजयी झाल्या.

Maharashtra Assembly Election 2024
माजी आमदार चंद्रदीप नरके (Reporter)

राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी ऑक्सीजनवर : दरम्यान आता कोल्हापूर उत्तरमधून लढण्यासाठी राजेश क्षीरसागर गेल्या पाच वर्षांपासून तयारी करत आहेत. मात्र याच मतदारसंघावर आता भाजपानं आपला दावा केला. इथून सत्यजित कदम, खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे लढण्यास इच्छुक आहेत. गेल्या काही दिवसांपासून सत्यजित कदम यांनी मुंबईत तळ ठोकला आहे. तर राजेश क्षीरसागर मतदार संघात प्रचारासाठी फिरत आहेत. दुसऱ्या बाजूला धनंजय महाडिक यांनी आपल्या सुपुत्रासाठी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याच्या बातम्या आहेत. यामुळे सोमवारी रात्री अचानक राजेश क्षीरसागर यांनी मुंबई गाठत एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. असं असलं तरी आज जाहीर झालेल्या यादीत कोल्हापूर उत्तर आणि राजेश क्षीरसागर यांचं नाव नसल्यानं महायुतीतील हा सस्पेन्स वाढला आहे. राजेश क्षीरसागर यांची उमेदवारी ऑक्सीजनवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Maharashtra Assembly Election 2024
संताजी घोरपडे (Reporter)

करवीरमधून चंद्रदीप नरके यांना उमेदवारी : शिवसेनेच्या जाहीर झालेल्या पहिल्या 45 उमेदवारांच्या यादी करवीर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार चंद्रदीप नरके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे नरके गटातील कार्यकर्ते आनंदी असले तरी, महायुतीचे मित्रपक्ष असलेले जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. गेल्या महिनाभरापूर्वी जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे यांनी करवीर विधानसभा संघावर दावा सांगत ही जागा जनसुराज्य पक्षाला मिळावी, अशी मागणी महायुतींच्या नेत्यांकडं केली. या जागेवरून व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट अध्यक्ष संताजी बाबा घोरपडे यांना उमेदवार म्हणून घोषित केलं. गेल्या दीड दोन महिन्यांपासून संताजी घोरपडे यांनी देखील मतदारसंघ पिंजून काढण्यास सुरुवात केली. मात्र आता ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्यानं संताजी घोरपडे आणि विनय कोरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

हेही वाचा :

  1. शिवसेनेची पहिली यादी जाहीर: अमित ठाकरे vs सदा सरवणकर लढत, जाणून कोणत्या मतदार संघातून कोण मैदानात
  2. आमदारकीसाठी 'उड्या' मारणाऱ्यांची संख्या वाढली; राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्त्याचा राजीनामा
  3. जागावाटपाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमधील वाद सुटता सुटेना, जाणून घ्या राजकीय समीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.