ETV Bharat / state

मतांसाठी १२५ कोटींचे मनी लाँड्रिंग? ईडीचे मुंबई, नाशिकसह गुजरातमध्ये छापे - CASH FOR VOTES

विधानसभा निवडणुकीत गैरप्रकार होत असल्याच्या संशयावरून ईडीनं मुंबई आणि नाशिकमध्ये छापे टाकले आहेत. ईडीनं गुजरातमध्येही छापे टाकले आहेत.

ED raids in Maharashtra
ईडीचे मनी लाँड्रिग छापे (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2024, 12:27 PM IST

Updated : Nov 14, 2024, 12:45 PM IST

नवी दिल्ली - अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) आज कथित पैशांच्या बदल्यात मतदान ( Cash for vote) प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. तपासाचा भाग म्हणून ईडीकडून महाराष्ट्रासह गुजरातमध्ये छापे टाकण्यात येत आहेत.

ईडीच्या पथकांकडून अहमदाबादमधील १३ ठिकाणे, सुरतमधील तीन परिसर, मालेगाव, नाशिकमधील दोन परिसर आणि मुंबईतील पाच परिसरात छापे टाकण्यात येत आहेत. मतदानाच्या बदल्यात पैसे देण्याकरिता कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित पुरावे शोधणे हा ईडीचा उद्देश असल्याचं सूत्रांनी सांगितलं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारांची मने वळविण्यासाठी तब्बल 125 कोटी रुपयांचे मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तींच्या खात्यांचा गैरफायदा घेऊन पैशांचा वापर केल्याचा ईडीला संशय आहे. त्यामुळे ईडीनं हे छापे टाकले."

  • ईडीच्या अधिकाऱ्यानं सांगितलं, " "बेकायदेशीर निधी लपवण्यासाठी आणि शोध टाळण्यासाठी संशयितांवर खात्यांचा वापर केल्याचा आरोप आहे. बेकायदेशीर पैशांचा स्त्रोत शोधून काढणे आणि या बँक खात्यांचा किती प्रमाणात गैरवापर झाला, हे उघड करणं हे ईडीच्या तपासाचं उद्दिष्ट आहे."

व्होट जिहादचा सोमैय्या यांच्याकडून आरोप- भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी मालेगावात व्होट जिहादचा पैसा घोटाळाची व्याप्ती वाढल्याचा दावा केला. त्यांनी एक्स मीडियावर पोस्ट करत दोन आरोपींना अटक झाल्याची माहिती दिली. बुधवारी किरीट सोमैया यांनी मालेगाव येथील पोलीस आणि बँक अधिकारीची भेट घेतली. 24 बेनामी बँक खाती विविध बँकांमध्ये आढळल्याचा दावा माजी खासदार सोमैय्या यांनी केला.

Last Updated : Nov 14, 2024, 12:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.