ETV Bharat / state

ई-चलनद्वारे दंडाची रक्कम भरत असणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; नाहीतर होईल बँक अकाऊंट रिकामं

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 4, 2024, 10:00 AM IST

Updated : Feb 4, 2024, 10:12 AM IST

E Challan Fraud : वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांना दंडात्मक कारवाई करण्यासाठी ऑनलाईन ई-चलनद्वारे दंड आकारला जातो. याच संधीचा सायबर गुन्हेगार फायदा घेत, वाहनचालकांना दंड भरण्यासाठीचा फेक ई-चलनाचा मेसेज पाठवत आहेत. या माध्यमातून वाहनचालकांची फसवणूक होत असल्याचं दिसून आलंय.

Crime News
आरटीओ फ्रॉड मॅसेज
प्रतिक्रिया देताना सायबर तज्ञ तन्मय दीक्षित

नाशिक E Challan Fraud : ई चलनच्या नावाखाली परिवहन विभागाची बनावट लिंक वाहनचालकांना फोनवर टेक्स्ट मेसेजद्वारे पाठवली जाते. त्यानंतर वाहनचालकांच्या खात्यातून 500 ते 10 हजार रुपयांपर्यंतची रक्कम कट होत असल्याचा प्रकार समोर आलाय. आत्तापर्यंत 700 हून अधिक वाहनचालकांची लिंकद्वारे फसवणूक झालीय. तर पुराव्यांशी 165 वाहनचालकांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांना 22 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. अशात परिवहन विभागाचा डेटा हॅक झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून,लिंक ओपन न करण्याचं आवाहन परिवहन विभागानं केलंय.

दंड भरण्यासाठी बनावट लिंक तयार : नाशिक शहरामध्ये रस्त्यावर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यानंतर वाहतूक पोलिसांच्या वतीनं वाहनचालकांनावर दंडात्मक कारवाई केली जाते. यानंतर 'आरटीओ'कडून ऑनलाइन दंड (ई चलन) पाठवण्याची कारवाई केली जाते. यानंतर शासनाचा ई-चलनाचा मेसेज वाहनचालकांना येतो. दंड न भरल्यास न्यायालयाकडून नोटीस देण्याच्या भीतीनं वाहनचालक तातडीनं दंड भरण्यासाठी ही बनावट लिंक ओपन करतात. मात्र या लिंकद्वारे सुरुवातीला काही माहिती भरताच बँक डिटेल्स देताच खात्यातून थेट दंडाची रक्कम कपात झाल्याचं मेसेज येतो. अशात दंडाची रक्कम 500 रुपये असताना काही वाहनचालकांच्या खात्यातून पाच हजार रुपये तर काही खात्यातून दहा हजार रुपयांपर्यंत रक्कम कपात झाल्याचं लक्षात आलंय. यातील काही जागृत वाहनचालकांनी आरटीओ आणि पोलिसांकडं फसवणूक झाल्याच्या तक्रारी दाखल केल्या आहेत.

ई-चलनाची खरी लिंक आणि बनावट लिंक यातील फरक ओळखता येत नसला तरी स्कॅमर हे टेक्स्ट एसएमएसद्वारे लोकांना बनावट लिंक पाठवत आहेत. असे मेसेज येताच वाहनचालकांनी 'आरटीओ'शी संपर्क साधावा - प्रशांत देशमुख, परिवहन अधिकारी, नाशिक

अशी होते फसवणूक : वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना ऑनलाइन दंड ठोठावल्यानंतर काही वेळानंतर फोनवर ई-चलनचा मॅसेज पाठवला जातो. हा मॅसेज हुबेहुब परिवहनच्या मूळ वेबसाईटसारखा दिसतो. मॅसेजमध्ये पेमेंटची लिंक असते. तुम्ही या लिंकवर क्लिक करताच फसवणूक करणारे डेबिट, क्रेडिट कार्डसह यूपीआयची गुप्त माहिती स्कॅन करतात आणि त्या माध्यमातून बँक खात्यातील पैसे काढून घेतात. तर काहींच्या खात्यातून ऑनलाइन वस्तूंची खरेदी देखील केली जाते. मात्र, वाहतूक कर्मचाऱ्याने दंड ठोठावताच संबंधित वाहन धारकांच्या मोबाईलवर मॅसेज कसा येतो? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अशी काळजी घ्या : फसवणूक करणारे https://echallanparivahan.in ही लिंक वाहनचालकांना मेसेजद्वारे शेअर करतात. दरम्यान, https://echallan.parivahan.gov.in/index/accused-challan ही परिवहन विभागाच्या वेबसाईटची ऑफिशियल लिंक आहे. सरकारनं जारी केलेली लिंक gov.in नेच संपते. अशा अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअ‍ॅप किंवा एसएमएसद्वारे अशा दंडाचे मेसेज आल्यावर सर्वप्रथम त्यांची माहिती अधिकृत संकेतस्थळावर जाऊन घ्यावी, असं सायबर तज्ञ तन्मय दीक्षित यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. रुग्णवाहिकेतून गांजाची तस्करी; सव्वा कोटींचा ऐवज पोलिसांनी केला जप्त
  2. मुंबई पोलिसांनी सायबर गुन्हेगारांच्या तावडीतून ४८ तासात वाचवले गुन्ह्यातील ३.८० कोटी
  3. महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ उडवणारं 'ते' पत्र फेक; पोलिसांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणार

Last Updated : Feb 4, 2024, 10:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.