ETV Bharat / state

नरक चतुर्दशीला अंबाबाई मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित; 250 वर्षांपासूनची प्रथा आजही कायम

अंबाबाई मंदिरात अनेक सण उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात. नरक चतुर्दशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या काळात अंबाबाई मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित केला जातो.

Kolhapur Ambabai Temple
कोल्हापूर अंबाबाई मंदिर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 31, 2024, 4:30 PM IST

कोल्हापूर : साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेलं 'कोल्हापूर अंबाबाई मंदिर' हे देशभरात प्राचीन मंदिर म्हणून ओळखलं जातं. सतराव्या शतकात बांधण्यात आलेल्या मंदिरातील शिखरावर दीपावली (Diwali 2024) पर्वातील नरक चतुर्दशीच्या पहाटे मुख्य शिखरावर काकडा लावण्याची प्रथा आहे. गेल्या अडीचशे वर्षांपासून ही प्रथा कायम असून नरक चतुर्दशीपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत रोज पहाटे हा सोहळा आजही निरंतर सुरू आहे. वर्षातून एकदा होत असलेला हा सोहळा पाहण्यासाठी अंबाबाई मंदिरात भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

काय आहे प्रथा : लाखो दिव्यांनी आसमंत उजळवणारा सण म्हणजे 'दीपावली'. मात्र, पूर्वीच्या काळी नगरातील सर्वात उंच ठिकाणी दिवा अर्थात काकडा लावण्याची प्रथा होती. कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील सर्वात उंच शिखरावर सतराव्या शतकापासून नरक चतुर्दशीच्या पहाटे हा काकडा लावण्यात येतो. सुताच्या वातींचा आणि कापुराचा एकत्र केलेला जुडगा एका भांड्यात लावला जातो. यालाच काकडा असं म्हटलं जातं. हा काकडा प्रज्वलित करून मंदिरातील मुख्य शिखरावर पश्चिमेकडे सर्वात उंचावर ठेवला जातो. त्यानंतर मशालीच्या साहाय्याने रोशन नाईक मंदिर परिसरातील इतर सर्व देवतांपुढे हा काकडा फिरवून कापूर लावतात.

अंबाबाई मंदिराच्या शिखरावर काकडा प्रज्वलित करण्याची प्रथा (ETV Bharat Reporter)

त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत असतो सोहळा : काकडा प्रज्वलित झाल्यानंतर मंदिराच्या मुख्य गर्भगृहात देवीची काकड आरती केली जाते. दीपावली पर्वातील नरक चतुर्दशी ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत रोज पहाटे हा सोहळा आजही होतो. राज्यात फक्त कोल्हापुरातील प्राचीन अंबाबाई मंदिरातच हा सोहळा होत असल्याचं अंबाबाई मंदिर अभ्यासक, प्रसन्न मालेकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं.

यांनी उतरवला होता आपल्या घराचा वरचा मजला : कोल्हापूरला प्राचीन परंपरा आहे. आताच्या भवानी मंडपात असलेल्या जुन्या राजवाड्याची कमान ही भाऊसिंगजी रोडवर राहात असलेल्या नगरशेठ म्हणजे झंवर मारवाडी यांची आहे. त्यावेळी झंवर यांनी ही प्रथा अखंड चालावी यासाठी, जास्त असलेला घराचा एक मजला उतरवला होता अशी नोंद करवीर महात्म्य ग्रंथात आढळते.

हेही वाचा -

  1. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पौराणिक मातृलिंग दर्शनासाठी गर्दी; वर्षातून केवळ पाच वेळाच मिळते दर्शनाची संधी, घ्या दुर्मीळ शिवलिंग दर्शन
  2. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील 'गरुड' मंडपाला 181 वर्षांचा इतिहास, जाणून घ्या धार्मिक महत्व - Ambabai Temple Garud Mandap
  3. अंबाबाई किरणोत्सव; मावळतीच्या सूर्यकिरणांनी अंबाबाई देवीला घातला अभिषेक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.