ETV Bharat / state

लक्ष्मीपूजन केव्हा करावं? 31 ऑक्टोबर की 1 नोव्हेंबर? जाणून घ्या योग्य तारीख - DIWALI 2024 LAKSHMI PUJAN

यंदा लक्ष्मीपूजन कोणत्या दिवशी करावं, याबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. राज्यात काही भागात 31 ऑक्टोबर रोजी तर काही भागात 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करता येणार.

DIWALI 2024 LAKSHMI PUJAN
लक्ष्मीपूजन 2024 (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 22, 2024, 10:18 PM IST

पुणे : काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीत लक्ष्मीपूजन कधी करायचं? याबाबत अनेक पंचांगकर्त्यांमधेच संभ्रमाची स्थिती निर्माण झालीय. अनेक पंचांग आणि कॅलेंडरमध्ये लक्ष्मीपूजन 1 नोव्हेंबरलाच होत असल्याची नोंद आहे. मात्र, राज्यातील काही भागात 31 ऑक्टोबर रोजी तर काही भागात 1 नोव्हेंबर रोजी नागरीकांनी लक्ष्मीपूजन करावं, असं आवाहन पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी केलं.

लक्ष्मीपूजन कधी करता येणार? : याविषयी अधिक माहिती देताना गौरव देशपांडे म्हणाले, "सर्व प्रमुख पंचांगांमध्ये यावर्षी लक्ष्मीपूजन हे 1 नोव्हेंबर या एकाच दिवशी असल्याचं नोंदवल्यानं या संदर्भात संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक पंचांगात व कॅलेंडरमध्ये धर्मशास्त्रातील वचनांचा, चुकीचा अर्थ काढून फक्त 1 नोव्हेंबर या एकाच दिवशी लक्ष्मीपूजन दिलेलं आहे. मात्र, धर्मशास्त्रात सांगितलेल्या वचनाचा नीट अर्थ लावला, तर यावर्षी 31 ऑक्टोबर व 2 नोव्हेंबर अशा दोन्ही दिवशी लक्ष्मीपूजन करता येणार."

पंचांगकर्ते गौरव देशपांडे (Source - ETV Bharat Reporter)

" 'निर्णयसिंधूत 'दण्डैकरजनीयोगे दर्शः स्यात्तु परेऽहनि । तदा विहाय पूर्वेद्युः परेऽन्हि सुखरात्रिका ।।' अर्थात जेव्हा दोन दिवस अमावास्या प्रदोषकाळात विद्यमान असेल, तेव्हा सूर्यास्तानंतर 1 दंड म्हणजे 1 घटिका अर्थात् 24 मिनिटं किंवा त्यापेक्षा जास्त अमावास्या असल्यास त्याच दिवशी म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावं. सूर्यास्तानंतर 24 मिनिटांपेक्षा कमी अमावास्या असल्यास आदल्या दिवशी म्हणजे 31 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन करावं असं दिलंय. त्यानुसार राज्यातील काही भागात 31 ऑक्टोबर तर काही भागात 1 नोव्हेंबर अशा दोन्ही दिवशी लक्ष्मीपूजन करता येणार आहे," असं देशपांडे यावेळी म्हणाले.

तुमच्या शहरात कधी करता येणार लक्ष्मीपूजन? : देशपांडे पुढे म्हणाले, "काशीतील पूज्यपाद पं. श्री गणेश्वरशास्त्री द्रविड गुरुजींनी सांगितल्याप्रमाणं 31 ऑक्टोबर रोजी अहमदनगर, औरंगाबाद, अहमदाबाद, वडोदरा, बंगळूरू, बीड, बेळगाव, धुळे, पुणे, गोकर्ण, हुबळी, जळगाव, जालना, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, सोलापूर, पणजी, रत्नागिरी, सांगली, सातारा, उस्मानाबाद, विजापूर, धारवाड या भागात लक्ष्मीपूजन करावं. तर 1 नोव्हेंबर या तारखेस अकोला, अमरावती, बिदर, बुलढाणा, भंडारा, भोपाळ, चंद्रपूर, गुलबर्गा, ग्वाल्हेर, हैदराबाद, लातुर, नागपूर, नांदेड, निझामाबाद, परभणी, वर्धा, यवतमाळ या ठिकाणी नागरीकांनी लक्ष्मीपूजन करावं."

भारताबाहेर लक्ष्मीपूजन कधी करावं? : भारताबाहेर 31 ऑक्टोबर रोजी संपूर्ण अमेरिका, लंडन, पॅरिस, रोम, वॉरसॉ, बर्लिन सोबतच पूर्ण युरोप खंड, दुबई, अबूधाबी, शारजा, सौदी अरेबिया आणि आफ्रिका या ठिकाणी लक्ष्मीपूजन करता येईल. तर सिंगापूर, मलेशिया, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान येथील भारतीय नागरिकांनी 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावं, असं देशपांडे यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. धनत्रयोदशीला करा हे तीन कार्य; घरात नांदेल सुख-समृद्धी
  2. यंदा कधी आहे दिवाळी; वसुबारसपासून ते भाऊबीजपर्यंत जाणून घ्या योग्य तिथी, शुभ मुहूर्त, तारीख
  3. शिवलिंग अन् नंदी दोघांचीही दिशा उत्तरेला ; सालबर्डीच्या गुहेत मुक्ताबाईंच्या भेटीला आलेत चक्रधर स्वामी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.