ETV Bharat / state

डॉक्टर कुटुंबियांनी जोपासला किल्ला बनवण्याचा छंद, यंदा साकारली 'सिंहगड' किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती - DIWALI 2024

दिवाळी आली की लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच किल्ला बनवण्याचे वेध लागतात. छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर कुटुंब हा छंद गेल्या 25 ते 30 वर्षांपासून जोपासत आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Doctors Family makes Sinhagad Fort replica on the occasion Diwali
डॉक्टर कुटुंबियांनी जोपासला किल्ला बनवण्याचा छंद (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 1, 2024, 10:28 AM IST

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : रांगोळी, कंदिल, फराळ आणि फटाके अशा सर्व गोष्टींप्रमाणेच दिवाळीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 'किल्ले' आहे. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की लहान मुलांना वेगवेगळे किल्ले बनवण्याचे वेध लागतात. लहान मुलंच काय तर अनेक ठिकाणी मोठी माणसंही आवडीनं किल्ले बनवतात. आपली अशीच आवड छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर कुलकर्णी यांचं संपूर्ण कुटुंब जपत आहे. यंदा कुलकर्णी कुटुंबानं 'सिंहगड' किल्ल्याची आकर्षक प्रतिकृती तयार केली आहे.

अभ्यास करून किल्ला बांधणी : शहरातील टिळक नगर भागातील अंकुर रुग्णालय दिवाळीत सर्वाचं आकर्षणाचं केंद्र बिंदू ठरतो. या रुग्णालयात तयार करण्यात आलेला किल्ला आकर्षक आहे. त्याचबरोबर हा किल्ला विद्यार्थ्यांना माहिती देणारा आणि जागृती करणारा ठरतो. कुलकर्णी कुटुंबातील सर्व सदस्य डॉक्टर आहेत. मात्र, दिवाळीमध्ये किल्ला बनवताना ते अगदी लहान मुलांप्रमाणे कामाला लागतात. यंदा त्यांनी किल्ले सिंहगडाची प्रतिकृती साकारली. दसरा झाला की एखादा रविवार पाहून ते कामाला लागतात. "जवळपास 10 ते 15 दिवस फावल्या वेळेत किल्ल्याची निर्मिती केली जाते. त्यासाठी आधी किल्ला पाहून येतो. त्यानंतर इंटरनेटवर त्यांचे बारकावे पाहून किल्ला तयार करतो", अशी माहिती डॉ. मेधा अनिल कुलकर्णी यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगरमधील डॉक्टर कुटुंबियांनी साकारली 'सिंहगड' किल्ल्याची प्रतिकृती (ETV Bharat Reporter)

तीस वर्षांपासून दरवर्षी किल्ला तयार करण्याचा छंद : डॉ. अनिल कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी डॉ मेधा गेल्या तीस वर्षांपासून किल्ला तयार करत आहेत. सुरुवातीला संसाधन कमी असल्यानं लहान किल्ला तयार केला जायचा. मात्र, त्यानंतर किल्ला तयार करण्यापेक्षा माहिती घेऊन अभ्यासपूर्ण एखादा किल्ला तयार करायला हवा, असं त्यांनी ठरवलं. त्यामुळं सुट्टीच्या काळात वेगवेगळ्या किल्ल्यावर जाणं, तेथील माहिती गोळा करणे, फोटो व्हिडिओ काढून ठेवण्याचं काम ते करू लागले. "दिवाळी आली की किल्ला तयार करताना संबंधित किल्याची माहिती इंटरनेटवर शोधून तोफ, सैनिक, मंदिर असे इतर साहित्य तयार करण्याचं काम केलं जातं. या कामात रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची साथ मिळते. याआधी रायगड, तोरणा, देवगिरी, प्रतापगड अशा किल्ल्यांची प्रतिकृती साकारल्या आहेत", माहिती डॉ. प्राची कुलकर्णी यांनी दिली.

किल्ले तयार करताना मिळतो आनंद : डॉ. मेधा यांचा मुलगा डॉ. अजिंक्य आणि सून डॉ प्राची हे देखील किल्ला तयार करण्यासाठी अभ्यास करत असतात. "हे काम करताना पुन्हा लहान झाल्यासारखं वाटतं. करण्यात आलेला किल्ला दिवाळी नंतर जवळपास दोन महिने तसाच ठेवला जातो. आसपासच्या शाळेतील विद्यार्थी किल्ला पाहून अनेक प्रश्न विचारतात, त्यांना उत्तर देऊन आणखी शिकायला मिळतं", असं मत डॉ अजिंक्य यांनी व्यक्त केलं. आजच्या पिढीला किल्ला संवर्धन कळावं, त्यात त्यांचा रस वाढवा, त्याची माहिती मिळावी यासाठी हा प्रयत्न करत असल्याचं कुलकर्णी कुटुंबियांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुलांबरोबर केली दिवाळी साजरी; मुलांना घातलं 'अभ्यंगस्नान'
  2. दिवाळीनिमित्त करीना कपूर खान ते सोनाक्षी सिन्हापर्यंत बी टाउन सेलेब्सनं दिल्या चाहत्यांना शुभेच्छा, पोस्ट व्हायरल
  3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवानांसोबत साजरी केली दिवाळी; सैनिकांबरोबर दिवाळी साजरी करण्याची परंपरा कायम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.