ठाणे Lok Sabha Thane : मागील काही दिवसांपासून ठाण्यातील शिंदे गटाचा लोकसभेचा उमेदवार जाहीर होत नाही. मात्र, अशावेळी एका कार्यक्रमातील फोटोमुळे आता नव्या चर्चेला उधाण आलं आहे. हा फोटो आहे मुख्यमंत्री आणि भाजपा नेते संजीव नाईक यांचा. या ठाण्यातील जागेसाठी नाईक कुटुंबीयांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती. मात्र, ही जागा आपल्याकडे म्हणजे शिंदे गटाकडे ठेवण्यासाठी आग्रही आहेत. (Chief Minister Eknath Shinde) महायुतीच्या जागा वाटपाबाबत एकीकडं चर्चा, बैठका आणि खलबते सुरू असतानाच ठाण्याच्या जागेचा तिढा अखेर सुटल्याची चिन्हं दिसत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचे माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांना चक्क शुभेच्छा दिल्यानं ठाणे लोकसभेसाठी 'ठाणेदार' मिळाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
राष्ट्रवादीकडून उमेदवारीचा आग्रह : राजस्थान स्थापना दिनाच्या निमित्तानं ठाण्यातील वर्तकनगर येथे राजस्थान विकास मंच, ठाणे शहर यांच्या वतीने आयोजित "एक शाम राजस्थान स्थापना दिवस के नाम" या भव्य सांस्कृतिक विशेष कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे आणि डॉ. संजीव नाईक यांच्यातील या भेटीमुळे ठाणे लोकसभेसाठी महायुतीचा 'ठाणेदार' ठरल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. डॉ. नाईक यांच्याबाबत मुख्यमंत्रीही अनुकूल असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, याविषयी शिवसेना तसंच भाजपाकडून अद्याप कुणीही अधिकृत भाष्य केलं नसलं तरी, उभय पक्षाकडून तसेच राष्ट्रवादी (अजितदादा गट) कडूनही डॉ. संजीव नाईक यांनाच कौल असल्याचं सूचित केलं जात आहे.
राजस्थान विकास मंचाचे सर्व पदाधिकारी उपस्थित : ठाण्यातील वर्तकनगर येथील वेदांत सभागृहात आज सांस्कृतिक अभिमान आणि समृद्ध वारसा लाभलेल्या विरभूमी राजस्थानच्या स्थापना दिनानिमित्त सत्कार सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या राजस्थानी समाजातील व्यक्तिमत्वांना राजस्थान भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. राजस्थान विकास मंचाचे सर्व पदाधिकारी आणि राजस्थानी समाजातील बांधव, भगिनी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
हेही वाचा :