ETV Bharat / state

नागपूर दीक्षाभूमी तोडफोड प्रकरणी वंचितच्या शहराध्यक्षांसह 15 जणांवर गुन्हा दाखल, दीक्षाभूमीला छावणीचे स्वरूप - Nagpur Deekshabhoomi

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 3, 2024, 8:50 AM IST

Nagpur Deekshabhoomi : नागपूरमधील दीक्षाभूमी येथे 1 जुलै रोजी घडलेल्या तोडफोड प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्षांसह अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस तैनात करण्यात आल्यानं दीक्षाभूमीला छावणीचे स्वरूप आले.

Nagpur Deekshabhoomi
Nagpur Deekshabhoomi (Source - ETV Bharat)

नागपूर Nagpur Deekshabhoomi : दीक्षाभूमी येथे 1 जुलै रोजी घडलेल्या तोडफोड व जाळपोळ प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्षसह विविध सामाजिक संघटनांच्या एकूण 15 ज्ञात आणि इतर अनेक अज्ञात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीक्षाभूमीवर झालेलं हिंसक आंदोलन, बांधकाम साहित्याची तोडफोड व आग लावल्याच्या घटनेबद्दल नागपूर पोलिसांनी बजाज नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे यात वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांचं नाव आहे. याशिवाय इतर अनेक सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात : दीक्षाभूमीच्या परिसरात सुरू असलेल्या भूमिगत पार्किंगचा वाद आणखी चिघळू नये, यासाठी काल संपूर्ण दीक्षाभूमी परिसरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. दीक्षाभूमीवर 1 जुलै रोजी भीम अनुयायांचा प्रक्षोभ उसळला होता. त्यामुळं दीक्षाभूमीवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलाय. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या सर्वच मार्गावर बॅरिकेडिंग करण्यात आलीय.

दीक्षाभूमीला छावणीचे स्वरूप : दीक्षाभुमीकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर बॅरिकेडिंग लावण्यात आली आहे. वाहनांना प्रवेश नाकारण्यात आलाय. नागपूर दीक्षाभुमीवर काल झालेल्या प्रक्षोभानंतर पूर्ण दीक्षाभूमी परिसराला बंदोबस्त लावण्यात आलाय. संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप प्राप्त झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन नये म्हणून पोलीस अलर्टवर झाले आहेत.

  • घटनेचा तपास सुरू : दीक्षाभूमीवर झालेल्या कालच्या घटनेत नागपूर बाहेरील लोकांचा जास्त समावेश असल्याची बाब तपासात उघड झाली आहे. नागपूरचे सह पोलीस आयुक्त अस्वती दोरजे यांची माहिती दिली आहे. घटनेची चौकशी सुरू आहे. घटनेसाठी जबाबदार असलेल्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात येतील, असंदेखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा

  1. गुप्तचर विभागात नोकरी ते धार्मिक सत्संग; कोण आहेत हे भोले बाबा? 116 जणांच्या मृत्यूनंतर काढला पळ - Hathras Stampede Incident
  2. गोरगरिबांच्या 'खिशाला आग'; मनपाकडून मोफत असणाऱ्या सीबीएससी शिक्षणाला शुल्क - No More Free Education In CSMC
  3. महिलांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्री "माझी लाडकी बहीण" योजनेच्या अर्जासाठी मुदत वाढ...डोमिसाइलचीही गरज नाही - अजित पवार - Ajit Pawar On Ladki Bahin Yojana
  4. मला गोळ्या घातल्या तरी मी कुणाच्या बापाला भीत नाही; अंतरवालीत घिरट्या घालणाऱ्या ड्रोनवर जरांगे यांची प्रतिक्रिया - Manoj Jarange Patil

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.