ETV Bharat / state

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी बनविली "दिग्विजय योद्धा पगडी", जाणून घ्या वैशिष्ट्ये - Digvijay Yoddha Pagadi - DIGVIJAY YODDHA PAGADI

Digvijay Yoddha Pagadi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज (29 एप्रिल) पुणे दौऱ्यावर आहेत. ते उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. या औचित्यावर पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून "दिग्विजय योद्धा पगडी" बनविण्यात आली आहे. पंतप्रधान आज ही पगडी परिधान करणार आहेत.

Digvijay Yoddha Pagadi
दिग्विजय योद्धा पगडी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 7:05 PM IST

पगडीविषयी माहिती देताना मुरुडकर झेंडेवाले

पुणे Digvijay Yoddha Pagadi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर असून पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ ते आज सभा घेणार आहेत. पुण्यातील रेस कोर्स येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही सभा होणार आहे. या सभेसाठी भाजपाकडून जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. जवळपास एक लाखाहून अधिक लोक या सभेला येणार आहेत. असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून "दिग्विजय योद्धा पगडी" बनविण्यात आली आहे. ही पगडी आज (29 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिधान करण्यात येणार आहे.

'ही' आहेत पगडीची वैशिष्ट्ये : याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्यासाठी पगडी बनवण्यात आली होती. आज जी पगडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परिधान करण्यात येणार आहे ती पगडी दिग्विजय योद्धा पगडी असून लाल रंग असलेली पारंपरिक पुरातन पद्धतीप्रमाणे हाताने बांधलेली ही विशेष पगडी आहे. ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणारी, मोत्यांच्या तुऱ्यासह डोलवणारी, शुभचिन्हांनी नटवलेली, पंचधातूंनी सजवलेली, साक्षात तुळजाभवानी मस्तकी धारण करणारी, उन्हाळ्यातही सुसह्य व्हावी अशी खास बांधणी असणारी अप्रतिम नाविन्यपूर्ण ही पगडी असल्याचं यावेळी गिरीश मुरुडकर यांनी सांगितलं.

पगडी पूर्णपणे 'एअर कंडीशन' : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमान वाढलं आहे. तसंच उन्हाचा चटका देखील मोठ्या प्रमाणात वाढलेला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी जी पगडी बनवण्यात आली आहे, ती पगडी पूर्णपणे 'एअर कंडीशन' पगडी आहे. ही पगडी हाताने तयार करण्यात आली असून यात हवा खेळती राहणार आहे. एवढंच नाही तर ही पगडी तयार करताना पंचधातूचा वापर करण्यात आला आहे. पगडीवर ऐतिहासिक कोयऱ्या चांदीच्या गोल्ड प्लेटेड प्लेट्स लावण्यात आल्या आहेत. तसंच पगडीच्या शिरोभागी आई तुळजाभवानीची प्रतिमा लावण्यात आली आहे. या पगडीला "दिग्विजय योद्धा पगडी" असं नाव देण्यात आलं आहे, असं देखील यावेळी गिरीश मुरूडकर म्हणाले.

हेही वाचा :

  1. पंतप्रधान मोदी सलग दोन दिवस राज्यात करणार झंझावती प्रचार , जाणून घ्या राज्यातील राजकीय परिस्थिती - PM MODI MAHARASHTRA visit
  2. बाप्पा यांना पाव रे! अरविंद सावंत, अनिल देसाईंसह राहुल शेवाळे अर्ज दाखल करण्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या चरणी - Lok Sabha Election
  3. पंतप्रधान मोदींचं मिशन महाराष्ट्र! आज आणि उद्या राज्यात घेणार सहा सभा, भर उन्हात तापणार राजकारण - LOK SABHA ELECTION 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.