ETV Bharat / state

धाराशिवसह छत्रपती संभाजीनगर नावावर सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब, नामांतराला आव्हान देणारी फेटाळली याचिका - SC Rejected City Renaming Petition

SC Rejected City Renaming Petition : राज्य शासनाकडून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलल्या गेल्याने या विरोधात काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या फेटाळल्या गेल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. परंतु, सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवत याचिका फेटाळली.

SC Rejected City Renaming Petition
सर्वोच्च न्यायालय (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 8:31 PM IST

नवी दिल्ली SC Rejected City Renaming Petition : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावे बदलण्याविरोधात काही जणांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. न्यायमूर्ती हृषिकेश रॉय आणि एसव्हीएन भाटी यांच्या खंडपीठानं दोन शहरांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळणारा मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवला.

अधिसूचनेच्या वैधतेला न्यायालयात आव्हान : महाराष्ट्र शासनानं औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांची नावं बदलून अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्याबाबत अधिसूचना जारी केली होती. औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव शहर करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यानं महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेच्या वैधतेला न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे की, अशा प्रकरणांवरून वेगवेगळ्या लोकांमध्ये मतभेद असू शकतात. तर काहीजण सहमत असू शकतात. तर काही शहरांच्या नावातील बदलांशी असहमत असू शकतात.

हा तर्कसंगत आदेश : सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करताना म्हटले आहे की, "हा तर्कसंगत आदेश आहे. दोन शहरांची नावे बदलण्यापूर्वी राज्यानं कायद्यानुसार प्रक्रियेचे पालन केले होते." यापूर्वी मे महिन्यात मुंबई उच्च न्यायालयानं दोन शहरांची नावे बदलण्याच्या अधिसूचनेला आव्हान देणारी याचिका फेटाळली.

याचिका फेटाळताना न्यायालयानं काय म्हटलं?: शेख मसूद इस्माईल शेख यांच्यासह अनेकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळताना शेक्सपियरच्या रोमिओ अँड ज्युलिएटचा उल्लेखही केला होता. "नावात काय आहे? गुलाबाला दुसऱ्या नावानं म्हटले तरी त्याचा सुगंध येणारच आहे."

हेही वाचा :

  1. 'सरकारी पातळीवर लवकरच औरंगाबादचे नाव संभाजीनगर होणार'
  2. 'आगामी निवडणुकांमुळेच शहरांची नावे बदलण्याचा घाट'
  3. 'नामांतराबाबतची काँग्रेसची भूमिका मुख्यमंत्र्यांना पटवून देऊ'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.