ETV Bharat / state

धैर्यशील मानेंवर मोठी जबाबदारी ; शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी करण्यात आली निवड - Dhairyashil Mane Appointed

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 31, 2024, 2:16 PM IST

Dhairyashil Mane Appointed : शिवसेनेचे नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे तरुण तडफदार खासदार धैर्यशील माने यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली आहे. खासदार धैर्यशील माने यांना शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली.

Dhairyashil Mane Appointed
खासदार धैर्यशील माने (Reporter)

मुंबई Dhairyashil Mane Appointed : सध्या दिल्लीत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यातील खासदार सभागृहात आपापल्या मतदारसंघातील समस्या, प्रश्न मांडताना दिसत आहेत. मात्र शिवसेना पक्षाकडून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. लोकसभेत शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी निवड झाल्यानं धैर्यशील माने यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला आहे.

Dhairyashil Mane Appointed
पत्र (Reporter)

युवा खासदारांवर पक्षाकडून मोठी जबाबदारी : धैर्यशील माने हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. या मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा धैर्यशील मानेंना मतदारांनी खासदार म्हणून निवडून दिलं आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या नियुक्तीचं पत्र शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांकडं सादर केलं. दरम्यान, शिवसेना पक्षानं धैर्यशील माने यांची उपनेतेपदी निवड करुन एका युवा खासदारावर लोकसभेची जबाबदारी सोपवली आहे. अभ्यासू, तरुण आणि तडफदार खासदार अशी धैर्यशील माने यांची राजकारणात ओळख आहे.

श्रीकांत शिंदेंनंतर आता धैर्यशील माने : लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्षाचे 7 खासदार निवडून आले आहेत. या खासदारांनी केंद्रात मोदी सरकारला पाठिंबा दिला आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची शिवसेना पक्षाच्या लोकसभेतील गटनेतेपदी निवड करण्यात आली होती. यानंतर आता शिवसेना संसदीय पक्षाच्या उपनेतेपदी खासदार धैर्यशील माने यांची निवड करण्यात आली आहे. अर्थसंकल्पावरील भाषणात धैर्यशील माने यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला होता. त्यासह संसदेत विविध प्रश्नांवर खासदार धैर्यशील माने हे विरोधकांवर तुटून पडत असल्याचं बोललं जाते. त्यामुळे पक्षानं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा :

  1. ठाकरे पिता-पुत्रांनी दोन वर्षात मुख्यमंत्र्यांना शिव्या-शाप दिल्याशिवाय काय केलं; खासदार श्रीकांत शिंदेंचा सवाल - Lok Sabha Election 2024
  2. इचलकरंजीत प्रचार सभेत गोविंदा यांचा धम्माल डान्स; खासदार धैर्यशील मानेंच्या प्रचाराचा महिला मेळावा गोविंदानी गाजवला - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.