ETV Bharat / state

विजय वडेट्टीवार पाकिस्तानात...?; देवेंद्र फडणवीसांचा सवाल, ठाकरेंवरही हल्लाबोल - Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यावर 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी केलेल्या आरोपांवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली. वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलताय. मात्र, त्यावर उद्धव ठाकरे मूग गिळून बसल्याचा टोला त्यांनी लगावला.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस (Reporter ETV Bharat Maharashtra)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 7, 2024, 6:16 PM IST

Updated : May 7, 2024, 6:44 PM IST

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया (Reporter ETV Bharat Maharashtra)

मुंबई Devendra Fadnavis : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हुतात्मा आयपीएस अधिकारी हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या विधानावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. वडेट्टीवार यांनी हेमंत करकरे यांच्या मृत्यू मागं राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह भाजपाचा हात असल्याचा आरोप केलाय. त्याचबरोबर भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकम देशद्रोही असल्याचा आरोप देखील वडेट्टीवार यांनी केला आहे. वडेट्टीवार यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक शब्दात समाचार घेतलाय. वड्डेटीवार यांच्या विधानाशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलाय.

मतांच्या लाचारीमुळं उद्धव ठाकरे गप्प : "हेमंत करकरे यांना गोळ्या अजमल कसाबनं मारल्या नाहीत, असं म्हणणारे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. मात्र, यावर उद्धव ठाकरे गप्प का आहेत? वडेट्टीवार यांच्या आरोपाशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का? असं उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावं," असं आव्हान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, "मुंबई हल्ल्यातील आरोपींना शिक्षा बजावण्यात ॲड. उज्ज्वल निकम यांनी बजावलेल्या भूमिकेचं शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी कौतुक केलं होतं. परंतु, वडेट्टीवार निकम यांच्यावर बेछूट आरोप करत आहेत. मतांच्या लाचारीमुळं उद्धव ठाकरे गप्प बसले आहेत."

उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प : "या प्रकरणात चौकशीच करायची असेल, तर ती विजय वडेट्टीवार यांची झाली पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला काँग्रेसचा नेता खुलेआम पाकिस्तानधार्जिणी विधानं करत आहे. त्यावर उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प का?. हेमंत करकरे अजमल कसाबच्या गोळीनंच हुतात्मा झाले, हे न्यायालयात सिद्ध झालंय. तसंच पाकिस्तानमधील कुणाच्या संपर्कात वडेट्टीवार आहेत?" असा सवालही त्यांनी केला. मुंबई हल्ल्याबाबत न्यायालयात सर्व बाबी स्पष्ट झाल्या आहेत. 26 नोव्हेंबरचा दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानचा कट होता. अजमल कसाबच्या गोळीनंच हेमंत करकरे हुतात्मा झाले, हे न्यायालयामध्ये सिद्ध होऊन पाकिस्तान तोंडघशी पडले होते, याची आठवणसुद्धा फडणवीस यांनी करून दिली. भाजपा उज्ज्वल निकम यांच्या पाठीशी असून, शेकडो मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या अजमल कसाबसोबत काँग्रेस आहे, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हे वाचलंत का :

  1. पालघर लोकसभा मतदारसंघाची गणितं बदलणार, खासदार राजेंद्र गावित यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता - Rajendra Gavit join BJP
  2. शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले... - Dattatray Bharane Viral Video
  3. बारामतीत रंगलं 'माँ का आशीर्वाद' नाट्य, देवेंद्र फडणवीसांनीही दिलं प्रोत्साहन - Loksabha election 2024

Last Updated : May 7, 2024, 6:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.