नाशिक MP Sanjay Raut : अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोशल मीडियावर एक फोटो ट्विट केला. (Politics) कारसेवक जेव्हा अयोध्येला निघाले होते. तेव्हाचा नागपूर रेल्वे स्टेशनवरचा हा फोटो असल्याचं फडणवीस म्हणाले. (Maharashtra Politics) यावरून संजय राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधत फडणवीस हे नागपूर रेल्वे स्टेशनवर फिरायला गेले असतील अशा उल्लेख केला होता. यावर फडणवीस यांनी मी मूर्खांच्या प्रश्नांना उत्तर देत नाही असं म्हटलं होतं. यावर राऊत यांनी पुन्हा फडणवीस हे शतमूर्ख आहे. पण, मी तसं म्हणणार नाही असं म्हणत हा वाद सुरू ठेवलाय. (India Politics)
राऊतांचा हल्लबोल : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या सहभागाबाबत प्रश्न उपस्थित केले. हे संकुचित वृत्तीचं लक्षण आहे. तुमचे लोक तिथून पळून गेले. या प्रकरणात बाळासाहेब ठाकरेंनी बाबरी ढाचा पाडण्याची जबाबदारी स्वीकारली. देवेंद्र फडणवीसांकडे नागपूरच्या स्टेशनवरचा फोटो आहे. आमच्याकडे शिवसैनिक घुमटावर असल्याचे फोटो आहेत, असं म्हणत फडणवीस हे नागपूर रेल्वे स्टेशनवर फिरायला गेले असावे, असं राऊत यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या छायाचित्रकाराचा उल्लेख केला ते नवभारतमध्ये कधीही काम करत नव्हते. तर ते लोकमत वृत्तपत्रात काम करत होते. त्या फोटोत देवेंद्र फडणवीस सदृश्य तरुण त्या गर्दीत दिसत आहे, असं संजय राऊत म्हणाले.
देशात हुकूमशाही सुरू आहे : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सोबत माझं बोलणं झालं. काल आसाममध्ये त्यांच्या 'भारत जोडो न्याय' यात्रेवर हल्ला केला गेला, हे लोकशाही विरोधी आहे. ही हुकूमशाही आहे. याचा शिवसेना निषेध करते. हे वातावरण बदलण्यासाठी आमचं नाशिकमध्ये शिवसेनेचं अधिवेशन आहे. सध्या अयोध्येत राजकीय उत्सवाचं वातावरण आहे. भाजपाने 2024 च्या प्रचाराची तयारी सुरू केली आहे यातून दिसून येत आहे. हा राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा होतो. म्हणून चार शंकराचार्यांनी या कार्यक्रमाला येण्यास नकार दिला. प्रभू राम जेवढे अयोद्धेचे आहेत, तेवढे ते पंचवटीचे आहेत. एकनाथ शिंदे यांना याआधीही आम्ही अयोध्येत घेऊन गेलो होतो. आता मुख्यमंत्री यांना भाजपाचा आदेश पाळावा लागेल. म्हणून ते अयोध्यात चालले आहेत, असं म्हणत राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील लक्ष्य केलं.
हेही वाचा: