मुंबई : Devendra Fadnavis Kar seva : बाबरी मशिदेचा ढाचा कुणी पाडला? त्यावेळी तिथं कोण उपस्थित होतं? यावरून ठाकरे गटाकडून होणाऱ्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोशल मीडियातून उत्तर दिलं आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांचा एक जुना फोटो आपल्या एक्स मीडियावरून प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये आपल्या फोटोला मार्क करत त्यावेळी आपण उपस्थित होतो, असा दावा करत फडणवीस यांनी एकप्रकारे पुरावाचं सादरं केला आहे.
काय आहे ट्वीट : जुनी आठवण... नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र. छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत प्रभूश्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा होत असताना या छायाचित्राच्या माध्यमातून जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे... नवभारत परिवाराचा मी अतिशय आभारी आहे. अस ट्वीट देवेंद्र फडणवीस यांनी केलय.
-
जुनी आठवण...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 21, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र.
छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत… pic.twitter.com/v3NFbCSY1v
">जुनी आठवण...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 21, 2024
नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र.
छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत… pic.twitter.com/v3NFbCSY1vजुनी आठवण...
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 21, 2024
नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘दै. नवभारत’ने मला हे छायाचित्र आवर्जून पाठविले. अयोध्येला जाणार्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचे हे छायाचित्र.
छायाचित्रकार शंकर महाकाळकर यांनी ते टिपले आहे. उद्या (22 जानेवारी) अयोध्येत… pic.twitter.com/v3NFbCSY1v
मी कारसेवक असल्याचा अभिमान : काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी आपण कारसेवक असल्याचा आपल्याला अभिमान आहे असं म्हटलं होतं. तसंच, बाबरीचा ढाचा पाडण्याचं काम चालू असताना काही लोक घरात बसले होते. त्यांना काय माहित कोण खरं आणि कोण खोट? असं म्हणत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर ठाकरे गटानंही यांच वय नेमकं किती आहे, असा पलटवार केला होता. त्यामुळं अनेक दिवसांपासून कोण कारसेवक, कोण बाबरी पाडण्यासाठी गेलं, कोण नाही गेलं या विषयावर वाक्युद्ध सुरू आहे.
संजय राऊत यांनी काय दिलं होतं आव्हान? : आमच्याकडं प्रत्यक्ष घुमटावरचे फोटो आहेत. तुमचे नागपूर स्टेशनवरचे फोटो आहेत. पूर्वी लोक स्टेशनवर फिरायला जायचे असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर फोटोवर प्रश्न विचारला असता राऊत यांनी वरील टीका केलीय. तसंच, शिवसेनेच बाबरी पाडण्यात योगदान काय? हे कळायला फडणवीसांचं त्यावेळी तेवढं वय नव्हतं, असंही राऊत म्हणालेत. फडणवीसांनी थोड इतिहासात डोकावून पाहावं असा सल्लाही राऊतांनी दिलाय.
हेही वाचा :
1 अयोध्येला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! आता बसस्थानकावरच होणार कमी खर्चात राहण्याची सोय
2 प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठाना सोहळ्याचा आजचा सहावा दिवस, 125 कलशानं होणार पूजा
3 रामलल्लाचा फोटो लीक झाल्यानंतर मुख्य पुजारी संतापले, चौकशी करण्याची मागणी