ETV Bharat / state

जिवा-शिवाच्या बैलजोडीवर चढला शृंगारी साज, कोल्हापुरातील पंचगंगा नदीघाटावर बैलांची सवाद्य मिरवणूक - Bendur Festival Kolhapur - BENDUR FESTIVAL KOLHAPUR

Bendur Festival Kolhapur : बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा सण अशी बेंदूरची ख्याती आहे. या सणानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी आज (22 जून) गाय, म्हैस आणि बैलांना सजवून त्यांची वाद्यांच्या ठेक्यांवर मिरवणूक काढली. वाचा बेंदूर सणातील प्रथा परंपरांविषयी

Bendur Festival Kolhapur
बैलांसोबत पारंपरिक सण साजरा करताना गावकरी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 22, 2024, 9:46 PM IST

कोल्हापूर Bendur Festival Kolhapur : काळ्या मातीतून सोनं पिकावं यासाठी आपल्या मालकाबरोबर इमाने-इतबारे राबणाऱ्या पशुधनाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बेंदूर. आज जिल्ह्यात शेतकरी बांधवांनी बैलाबरोबरच म्हैस आणि गायींना सजवून त्यांची सवाद्य मिरवणूक काढली. कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाटावर सालाबाद प्रमाणे यंदाही पारंपारिक वाद्यांच्या गजरात शहरातील गवळी गल्ली, उत्तरेश्वर पेठ येथील बैल मालकांनी आपल्या लाडक्या जिवा-शिवाच्या बैलजोडीला आंघोळ घातली. यानंतर टोकदार शिंगांणा रंगरंगोटी करून अंगावर आकर्षक शालेमुळं देखण्या बैलाचं रुबाबदार रूप आणखी खुलुन दिसत होतं. ढोल ताशा आणि कडाडणाऱ्या हलगी-घुमक्याच्या तालावर नदीघाट परिसरात बैल पळवण्याच्या शर्यती पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती.

बेंदूर सणाचं महत्त्व सांगताना गावकरी (ETV Bharat Reporter)

कोल्हापुरात पारंपरिक पद्धतीनं बेंदूर साजरा : राज्यातील काही भागांमध्ये विशेषता आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यात वटसावित्रीची पौर्णिमा झाल्यानंतर बेंदूर सण साजरा केला जातो. मृग नक्षत्रावर येणाऱ्या पावसाच्या आधी शेतकरी शिवारातील पेरण्या संपवून आता काहीसा निवांत झाला आहे. आपल्या धन्याबरोबर अविरत कष्ट घेणाऱ्या बैलाप्रति कृतज्ञता म्हणून राज्यातील विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कर्नाटकी बेंदूर हा सण साजरा केला जातो. या दिवशी शेतकऱ्यांचा सखा अशी ओळख असलेल्या बैलाला विश्रांती दिली जाते. शेतकरी हा सण बैल आणि सोबतच्या पशुधनाबरोबर साजरा करतो. या दिवशी पुरणपोळ्यांचा नैवेद्य बैलांना खाऊ घातला जातो. कोल्हापुरातही पारंपरिक पद्धतीनं जिल्ह्यात कर्नाटकी बेंदूर सण उत्साहात साजरा झाला. ग्रामीण भागात बैलाच्या शर्यती लावून करी तोडण्याचा कार्यक्रमही काही ठिकाणी आयोजित केला होता.

Bendur Festival Kolhapur
बैलाच्या पाठीवर कोरलेला संदेश (Bendur Festival Kolhapur)

बैलाच्या अंगावर उमटले सामाजिक संदेश : बैलाला पारंपरिक पद्धतीनं सजवताना कोल्हापुरात तरुणांनी बैलाच्या अंगावर नैसर्गिक रंगाने सामाजिक संदेश रेखाटले होते. शिवरायांचा पराक्रमी इतिहास सांगणारा विशाळगड सध्या चर्चेत आहे. या ठिकाणी पशुहत्या थांबावी अशी मागणी काही संघटना करत आहेत. याचेच प्रतिबिंब आजच्या कर्नाटकी बेंदूर सणावर उमटले. सजवलेल्या बैलांच्या पोटावर नैसर्गिक रंगाने विशाळगड अतिक्रमण आणि पशुहत्या थांबली पाहिजे या आशयाचे संदेश लिहून या विषयाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न कोल्हापुरातील उत्तरेश्वर पेठ येथील तरुणांनी केला.

हेही वाचा:

  1. पेपर फुटला तर आता खैर नाही, होऊ शकतो १ कोटी रुपयांचा दंड, १० वर्षे तुरुंगवास; पेपर लीक विरोधी कायदा लागू - Anti Paper Leak Act
  2. हे सरकार जुमलेबाजांचं, मराठा-ओबीसींची करताहेत फसवणूक; सुप्रिया सुळेंची टीका - Supriya Sule PC
  3. परस्परविरोधी आंदोलनामुळं शेजाशेजारची दोन गावं राज्यभर चर्चेत; मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलनामुळं वाद पेटण्याची शक्यता - Maratha vs OBC reservation

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.