ETV Bharat / state

छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, नाशिकच्या कार्यालयात पाठवलं पत्र - Death Threat To Chhagan Bhujbal

Death Threat To Chhagan Bhujbal : अजित पवार गटात गेलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. नाशिकच्या कार्यालयात पत्र पाठवलं असून ठार मारण्याची सुपारी घेतली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

Death Threat To Chhagan Bhujbal again
छगन भुजबळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 9, 2024, 10:56 PM IST

मुंबई Death Threat To Chhagan Bhujbal : अज्ञात व्यक्तीकडून आपल्याला ठार मारलं जाईल, अशी एका पत्राद्वारे मंत्री छगन भुजबळ यांना धमकी देण्यात आली आहे. पोलिसांनी सुरक्षेत वाढ करावी, अशी छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. तेव्हाही त्यांना एका तरुणाकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती.

भुजबळांना जीवे मारण्यासाठी सुपारी - यापूर्वीही मंत्री छगन भुजबळांना जीवे मारण्यासाठी मला सुपारी मिळाली आहे, असं फोनवरून एका व्यक्तीनं धमकावल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. छगन भुजबळांना जीवे मारण्याच्या धमकीनं खळबळ उडाली होती. याची ऑडिओ क्लिपसुद्धा समोर आली होती. छगन भुजबळ यांना धमकी देणाऱ्या प्रशांत पाटीलला महाडमधून पुणे गुन्हे शाखेने ताब्यात घेतलं होतं. दारु पिऊन भुजबळांना धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. भुजबळ यांना धमकी देणारा प्रशांत पाटील मूळचा कोल्हापूरचा होता. त्यानं महाडमधून फोनवरून भुजबळांना धमकी दिली होती.

दारू पिऊन धमकावल्याचं निष्पन्न : छगन भुजबळ हे पुण्यात असल्यानं पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड झाल्यादिवसापासून छगन भुजबळ यांनी त्यांचे 'राजकीय गुरु' शरद पवार यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. शरद पवारांनीसुद्धा छगन भुजबळ आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात भुजबळ प्रतिनिधीत्व करत असलेल्या येरवडा मतदारसंघातून केली. येवला येथे झालेल्या सभेत पवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. थोरले पवार विरुद्ध भुजबळ यांच्यामधला संघर्ष मोठा होणार, असं चित्र दिसत असतानाच छगन भुजबळ यांना आलेल्या धमकीचे वेगवेगळे अर्थ राजकीय वर्तुळात लावले गेले असते. आता पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना धमकी आली आहे. त्यामुळे पोलीस त्याबाबत तपास घेत आहेत.

हेही वाचा:

  1. एकाचवेळी तिघांना भारतरत्न; नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एमएस स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च सन्मान
  2. 90 वर्षांचा इतिहास अभिमानाने मिरवणारे चर्चगेट येथील इरॉस सिनेमागृह, 7 वर्षांनी नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला
  3. राज्यातील सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, नाना पटोले यांची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.