ETV Bharat / state

देवेंद्र फडणवीसांनी 'या' कंपनीला दिली महाराष्ट्रात सेमीकंडक्टर प्लांट लावण्याची ऑफर - Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होरीबा फॅसिलिटी कंपनीचं उद्घाटन झालं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी होरीबा कंपनीला महाराष्ट्रात सेमीकंडक्टर प्लांट लावण्याची ऑफर दिली.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 7:00 PM IST

DCM Devendra Fadnavis
कार्यक्रमस्थळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)

नागपूर Devendra Fadnavis : नागपुरच्या बुटीबोरी इंडस्ट्रियल एरियाच्या दुसऱ्या फेजमध्ये होरीबा कंपनीनं मेडिकल डिव्हायसेस तयार करण्याचा प्लांट उभारलेला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होरीबा फॅसिलिटी कंपनीचं उद्घाटन झालं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी होरीबा कंपनीच्या प्रमुख यांना एक ऑफर दिली आहे. कंपनीनं महाराष्ट्रात सेमी कंडक्टर प्लांट लावावा, त्याकरिता जागा देखील उपलब्ध असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

माहिती देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (ETV Bharat Reporter)

काय म्हणाले फडणवीस : दरम्यान यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता ते म्हणाले, "अतिशय स्टेट ऑफ आर्ट अशा प्रकारचं मेडिकल डिवाइस निर्माण करण्याचा प्लांट आहे. आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे. मला असं वाटतं की आपल्या विकासामध्ये जी फॅसिलिटी तयार झाली आहे, ती यासाठी महत्त्वाची आहे की भारत हळूहळू मेडिकल डिव्हायसेसचा हब होतो आहे. जवळपास 10 बिलियन डॉलर्सचा एक्स्पोर्ट सुरू झालेला आहे. मोठ्या प्रमाणात आपल्या देशातच मेडिकल डिव्हाइसेसची निर्मिती होणार आहे. आपल्या देशाकरता आणि एक्स्पोर्ट करता देखील त्याची एक मोठी फॅसिलिटी निर्माण होणार आहे."

होरीबा कंपनीला महाराष्ट्रात सेमीकंडक्टर प्लांट लावण्याची ऑफर : होरीबा कंपनी ही 29 देशांमध्ये आहे आणि सेमीकंडक्टर क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं काम आहे. त्यांच्याशी सातत्यानं चर्चा चालली आहे. सेमीकंडक्टरमध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावी, तशी ऑफर देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीला दिलेली आहे. तुमच्याकरता आम्ही जागा देखील ठेवलेली आहे. तुम्ही तुमचं पत्र द्या आम्ही तुम्हाला ऑफर लेटर देतो अशी ऑफर देताच त्यांनी ही अतिशय सकारात्मक प्रतिसाद केलेला आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. लवकर त्यांच्याशी बातचीत होईल आणि सेमीकंडक्टर करता त्यांची इंवेस्टमेंट येईल असा मला पूर्ण विश्वास असल्याचं ते म्हणाले.

देशात महाराष्ट्राची उद्योग पॉलिसी सर्वात चांगली : महाराष्ट्राची उद्योग पॉलिसी देशात सर्वात चांगली आहे. आम्ही केंद्र सरकारच्या पॉलिसीपेक्षा अधिक काय देता येईल, त्याला कॉम्प्लिमेंट कसं करता येईल अशा प्रकारची पॉलिसी तयार केली आहे. त्यामुळं आता तीन मोठ्या कंपन्यांशी आमचं बोलणं चाललेलं आहे. एकदा ते बोलणं एका टप्प्यावर गेलं की आपल्याला निश्चितपणे त्याची माहिती देण्यात येईल.

हेही वाचा :

  1. गट क कर्मचाऱ्यांच्या परीक्षा एमपीएससी मार्फत; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - Devendra Fadnavis in Vidhansabha
  2. हा निवडणुकीचा नाही तर निर्धाराचा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस - Maharashtra Budget 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.