ETV Bharat / state

मुंबईतील 'या' स्थानकाचं नामकरण; विरोधकांच्या आरोपांना राहुल शेवाळेंचं प्रत्युत्तर - दादर मोनोरेल स्थानक नामकरण

Dadar East Monorail Station Rename : मुंबईतील दादर पूर्व मोनोरेल स्थानकाचं नाव बदललं आहे. यावरुन आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केलीय. या टीकेला खासदार राहुल शेवाळे यांनी उत्तर दिलंय. 'ईटीव्ही भारत'बरोबर Exclusive बोलताना राहुल शेवाळे यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिलंय.

Dadar east monorail station as Vitthal Mandir mp rahul shewale reply opposition allegation
दादर पूर्व मोनोरेल स्थानकावरुन करण्यात येणाऱ्या टीकेला राहुल शेवाळेंनी प्रत्युत्तर दिलंय
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 9, 2024, 5:46 PM IST

मुंबई Dadar East Monorail Station Rename : 'दादर पूर्व मोनोरेल स्थानक' आता 'विठ्ठल मंदिर स्थानक' म्हणून ओळखलं जाणार आहे. खासदार राहुल शेवाळे यांच्या पाठपुराव्यामुळं हे नामकरण झालंय. मात्र, आता यावरुन विरोधकांनी आरोप करण्यास सुरुवात केलीय. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नामकरण करण्यास सत्ताधाऱ्यांनी सुरुवात केली असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. याला खासदार राहुल शेवाळ यांनी प्रत्युत्तर दिलंय.

दादर मोनोरेल स्थानकाचं नामकरणाबाबत निर्णय प्रलंबित होता. प्रलंबित असलेला हा निर्णय आता पूर्ण झालाय. लोकं बोलतील की कामं झाली नाहीत, त्यामुळं हा निर्णय घेतलाय. विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत - राहुल शेवाळे, खासदार

दादर मोनोरेल स्थानकाला नवीन नाव : चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या मोनोरेल मार्गिकेवरील दादर पूर्व स्थानकाचं नामकरण आता 'विठ्ठल मंदिर मोनोरेल स्थानक' असं करण्यात आलंय. शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार राहुल शेवाळे यांनी याबाबत केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. स्थानिकांची मोठी मागणी प्रत्यक्षात उतरली असल्याची प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी 'ईटीव्ही भारत'बरोबर बोलताना दिलीय.

विठ्ठल मंदिराचा इतिहास : दादर पूर्व मोनोरेल स्थानकाजवळ असलेल्या विठ्ठल मंदिराचा इतिहास फार जुना आहे. हे मंदिर अनेक दशकांपासून प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं. यामुळं स्थानिक जनतेनं येथे उभारण्यात आलेल्या स्थानकाच्या नामकरणाची मागणी केली होती. खासदार राहुल शेवाळे यांनी जनतेच्या या मागणीबाबत 'एमएमआरडीए'कडं सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलंय.

नामकरणावरुन राजकारण तापलं : दादर मोनोरेल स्थानकाचं नाव बदलल्यानं यावरुन आता विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केलीय. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱ्यांनी स्थानकांचं नामकरण करण्याचा सपाटा लावलाय. आचारसंहिता आणि निवडणुका जवळ आल्यानं जनतेला खूश करण्यासाठी सत्ताधारी अशा पद्धतीचं नामकरण करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यामुळं ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. ठाण्याजवळ नवीन रेल्वे स्थानक होणार, कामाला मिळणार गती; वाचा कधीपर्यंत होणार प्रवाशांसाठी खुलं?
  2. अंधेरी रेल्वे स्थानक बाहेरील शिल्पाचं अभिनेता टायगर श्रॉफच्या हस्ते उदघाटन
  3. रुळावरुन प्लॅटफॉर्मवर चढलं रेल्वेचं इंजिन; वेग कमी असल्यानं टळला मोठा अपघात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.