ETV Bharat / state

डोंबिवलीतील चायनीज सेंटरमध्ये सिलेंडरचा स्फोट, सात ते आठ जण गंभीर जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक - Cylinder blast in Dombivli

Cylinder blast in Dombivli : डोंबिवलीतील चायनीज सेंटरमध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय. या घटनेत सात ते आठ जण गंभीर जखमी झाले असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

Cylinder explosion Chinese center
चायनीज सेंटरमध्ये सिलेंडरचा स्फोट (Reporter ETV Bharat Maharashtra)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 29, 2024, 8:25 PM IST

ठाणे Cylinder blast in Dombivli : डोंबिवलीतील केमिकल कंपनीच्या स्फोटाची घटना ताजी असतानाच चायनीज सेंटरमध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय. डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर भागातील ईश्वर रुग्णालयासमोरील रस्त्यावर बेकायदा सिध्दी चायनिज सेंटर चालविलं जातं. या दुकानात बुधवारी सायंकाळी पाच वाजता सिलेंडरचा स्फोट झालाय. त्यामुळं दुकानातील पाच ते सहा कामगारसह काही ग्राहक गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटानंतर दुकानाला आग लागून दुकान जळून खाक झालंय. या आगीत दोन कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तीन जखमींना केडीएमसीच्या शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयात तर, सहा जणांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सात जण किरकोळ जखमी झाले असून दोन जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.

डोंबिवलीतील चायनीज सेंटरमध्ये सिलेंडरचा स्फोट (Reporter ETV Bharat Maharashtra)

बेकायदा दुकानात सिलेंडरचा स्फोट : डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर भागातील ईश्वर रुग्णालयासमोरील मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर बेकायदा चायनीज विक्रीचं दुकान आहे. या दुकानात व्यापारी, घरगुती वापराचे एकूण सहा सिलेंडर होते. त्यामधील एका सिलेंडरचा स्फोट झाला. आगीवर अग्निशमन जवानांनी तातडीनं नियंत्रण मिळवलंय. त्यामुळं उर्वरित पाच सिलेंडरला कोणतीही हानी झाली नाही, असं जवानांनी सांगितलं. चायनीज केंद्र सुरू करण्याची तयारी सुरू असताना हा स्फोट झालाय. स्फोट होताच चायनिज सेंटरचे चारही बाजुचे पत्रे, छत स्फोटात उडालं.

दुकानातील सर्व साहित्य जळून खाक : सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर दुकानाला आग लागली. आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालं. स्फोट होताच रहिवासी घराबाहेर पडले. परिसरातील नागरिकांनी आगीवर पाणी ओतून आग नियंत्रणाचा आणण्याचा प्रयत्न केला. भर वस्तीत हा स्फोट झाल्यानं ही आग वाऱ्याच्या वेगानं क्रांतीनगर, इंदिरानगर झोपडपट्टी परिसरात पसरून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. मात्र, कल्याण डोंबिवली पालिकेचे अग्निशमन जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. दोन बंबांनी आगीवर पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणली. दोन्ही गंभीर जखमींना तातडीनं जवळच्या खासगी रुग्णालयात तर, तीन जणांना पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. स्फोट कशामुळं झाला, ही कामगारांची चूक होती का? या दिशेनं पोलीस तपास करणार आहेत.

कठोर कारवाईची नागरिकांची मागणी : कल्याण, डोंबिवली पालिका हद्दीत सायंकाळी चार ते पहाटे चार वाजेपर्यंत रस्त्यांंवर सिलिंडर लावून चायनिज विक्रेते चायनिज केंद्र चालवितात. अनेक केंद्रांच्या बाजूला चोरून मद्य विकलं जात असल्याच्या तक्रारी आहेत. संबंधित पोलीस ठाणे हद्दीतील पोलिसांच्या आशीर्वादानं रात्री उशिरापर्यंत ही चायनिज केंद्रं सुरू असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, कल्याण डोंबिवली पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी या प्रकरणात यंत्रणांना कठोर कारवाईचे आदेश देण्याची मागणी नागरिक करत आहेत.

हे वाचलंत का :

  1. डोंबिवली स्फोटात सापडलेल्या मृतदेहांची होणार डीएनए चाचणी, दोन बोटांवरून मृतदेहाची पटली ओळख - DOMBIVLI BLAST
  2. डोंबिवली अमुदान स्फोटातील मुख्य आरोपीला 29 मेपर्यंत पोलीस कोठडी - Amudan company explosion
  3. डोंबिवली एमआयडीसीतील कारखाने जणू 'मृत्युचे कारखाने', २०११ पासून ५५ दुर्घटनांमध्ये ५० पेक्षा जास्त बळी - dombiwali MIDC blast

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.