ETV Bharat / state

कमी बजेटमध्ये घ्या, कुल्लू-मनालीचा आनंद : 'या' पर्यटस्थळावर महाराष्ट्रातील पर्यटक लुटतात गुलाबी थंडीचा आनंद - Kukuru tourist spot - KUKURU TOURIST SPOT

Kukuru tourist spot : तुम्हाला जर कुल्लू मनालीचा आनंद घ्याचा असेल, तर मध्य प्रदेशातील कुकरू पर्यटनस्थळ तुमच्या यादीत असायला हवं. कारण या पर्यटनस्थळाला महाराष्ट्रातील पर्यटकांची गर्दी कायम असते. तसंच हे पर्यटनस्थळ पर्यटकांच्या खिशाला परवडण्यासारखं आहे.

Kukuru tourist spot
कुकरू पर्यटनस्थळ (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 22, 2024, 8:51 PM IST

Updated : Aug 23, 2024, 7:28 AM IST

संतोष अरसोड यांची प्रतिक्रिया (Source - ETV Bharat Reporter)

अमरावती Kukuru tourist spot : मध्य प्रदेशील सातपुडा पर्वत रांगेतील वन विभागाच्या अंतर्गत येणारं कुकरू हे पर्यटन केंद्र थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळा तसंच हिवाळ्यात धुक्यात बुडालेलं हे ठिकाण पर्यटकांना आकर्षित करतंय. मध्य प्रदेशातील या पर्यटन केंद्राला सर्वाधिक पसंती महाराष्ट्रात पर्यटकांनी दिलीय. विशेष म्हणजे एक दिवसाच्या सहलीसाठीदेखील हे ठिकाण पर्यटकांसाठी चांगला पर्याय ठरत आहे.

काय आहे कुकरूचं वैशिष्ट्य : मेळघाटातील सर्व महत्त्वाची ठिकाणी ब्रिटिशांनी विश्रामगृहे बांधली. ती ठिकाणे आज पर्यटनानं समृद्ध आहेत. अमरावती जिल्ह्यातील थंड ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिखलदरा ते चुर्णी या मार्गावर समुद्रसपाटीपासून 3667 फूट उंचीवर असलेल्या कुकरू गावाजवळ 1906 मध्ये ब्रिटिशांनी विश्रामगृह बांधलं होतं. या विश्रामगृहाच्या तिन्ही बाजूंना खोल दऱ्या आहेत. पावसाळ्यात तसंच हिवाळ्यात या खोल दऱ्यांमध्ये धुकं निर्माण झाल्यासारखं वाटतं. खोल दरीतून वर येणारं धुक्यामुळं कुकरूला अनोखं रुप येतं.

पर्यटन केंद्रातील सुविधा : खरं तर, कुकरू पर्यटन केंद्र हे मानसिक आणि बौद्धिक शांततेसाठी एक नैसर्गिक औषधं आहे. मध्य प्रदेश सरकारच्या वतीनं ब्रिटीशकालीन सध्याच्या विश्रामगृहांसह पर्यटकांसाठी नवीन खास दालन तयार करण्यात आलं आहे. आठ सार्वजनिक दालनांसाठी पर्यटकांना 450 रुपये प्रति व्यक्ती भाडं द्यावं लागतं. खासगी निवासाची व्यवस्थाही 1750 ते 2340 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. याशिवाय ज्यांना जंगलात तंबूत राहण्याचा आनंद घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी येथंही व्ययवस्था करण्यात आली आहे. 300 ते 1000 रुपयांपर्यंत तुम्हा तंबूत राहण्याची पैसे मोजावे लागतील. या पर्यटन केंद्राजवळील जंगलातील महत्त्वाची ठिकाणं पाहण्यासाठी जंगल सफारीची व्यवस्थाही उपलब्ध आहे. मध्य प्रदेश सरकारनं जेवणाची उत्तम व्यवस्था केल्यामुळं पर्यटकांना सकाळी घरून जेवण आणण्याची गरज नाही.

महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्यटक : कुकरू हे मध्य प्रदेशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे ठिकाण अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील घटांग गावापासून अवघ्या अकरा किलोमीटर अंतरावर आहे. कुकरू हे मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील भैसदेही तालुक्यात चिखलदरा, चुर्णीला लागून असलेल्या अनेक गावांना जोडणाऱ्या मार्गावर आहे. हे ठिकाण मध्य प्रदेशात येत असलं तरी हा संपूर्ण परिसर अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यांनी वेढलेला आहे. अमरावती ते चिखलदरा हे अंतर 82 किमी आहे. तसंच अमरावती ते कुकरू हे अंतर 88 किमी आहे. विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखलं जाणारं चिखलदरा पर्यटकांनी कायम गजबजलेलं असतं. त्यामुळं गेल्या वर्षभरात या ठिकाणी अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यातील पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेत मध्य प्रदेशातून कुकरूला येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या खूपच कमी आहे.

सेमाडोह आणि कोलकासला पर्याय : सुट्ट्यांमध्ये मेळघाटात जाण्याचा बेत असलेले पर्यटक चिखलदरा, सेमाडोह आणि कोलकास या तीन ठिकाणांवर अधिक लक्ष केंद्रित करतात. या तिन्ही ठिकाणच्या पर्यटन संकुलांची आरक्षणं अनेकदा बुक असतात. त्यामुळं कोलकास ऐवजी कुकरू हा पर्यटकांसाठी चांगला पर्याय आहे, असं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना यवतमाळचे पर्यटक संतोष अरसाेड यांनी सांगितलं.

हेही वाचा-

  1. वसंत फुलताना...पानगळीतही फुलांनी बहरला मेळघाट, पर्यटकांना करतोय आकर्षित

Last Updated : Aug 23, 2024, 7:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.