ETV Bharat / state

मनसेच्या मोदींना जाहीर पाठिंब्याच्या भूमिकेनंतर राज ठाकरेंवर जोरदार टीका अन् मिम्स - MNS support to Modi - MNS SUPPORT TO MODI

MNS support to Modi : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेते गुंतले आहे. तिकीट न मिळालेले काही नेते सत्ताधारी पक्षात प्रवेश करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्यसभा आणि विधानसभा नाकारून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर लगेचच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे. तसंच, सोशल मीडियावर देखील राज ठाकरे यांना जोरदार ट्रोल केलं जात आहे.

राज ठाकरे
राज ठाकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 10, 2024, 9:07 PM IST

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया

मुंबई : MNS support to Modi : मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या सभेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोणती भूमिका घेतात आणि मन सैनिकांना काय आदेश देणार याकडं सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी भेट झाल्यानंतर मनसे काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष होतं. सत्तेच्या वाट्यात आपल्याला पडायचं नव्हतं त्यामुळे आपण राज्यसभा आणि विधान परिषद नाकारली. देशाला खंबीर नेतृत्व हवं म्हणून महायुतीला त्यातल्या त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं राज यांनी जाहीर केलं. मनसैनिकांनी विधानसभेच्या तयारीला लागा अशा सूचना, देखील सभेतून त्यांनी केल्या आहेत.

ट्वीट
ट्वीट

आम्ही आमचं काम करत राहू : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांनी सोशल मीडियावर मनसेची खिल्ली उडवली आहे. यावर बोलताना, संदीप देशपांडे म्हणाले की अंजली दमानिया या आता आम आदमी पक्षात देखील नाहीत. त्यांची स्वतःची अशी वैचारिक बैठक देखील नाही. त्यामुळे आता पुढचे काही दिवस यांच्यासारखे लोक हे टीका करत राहतील. त्यामुळे या सर्वांना उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील नाही. ज्यांना टीका करायची आहे ते करतील. पण, राज ठाकरे यांनी जो निर्णय घेतला आहे, त्यांची जी भूमिका आहे ती पाडव्याच्या सभेत राज ठाकरे यांनी सर्वांसमोर मांडली आहे. त्यामुळे आम्ही आमचं काम करत राहू अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

ट्रोल तर होणारच : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेतून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर सोशल मीडियावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात पोस्ट व्हायरल होत आहेत. विरोधकांसह सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी देखील राज ठाकरें विरोधात ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राजकारण करत असताना आपण एखाद्या भूमिकेवर ठाम असायला हवं. मात्र, हवेच्या दिशेप्रमाणे आपली भूमिका बदलते तेव्हा लोक त्याचा स्वीकार करत नाहीत. मला प्रश्न असा पडला की 2019 मधील लाव रे तो व्हिडिओ म्हणणारे, नंतर पाच वर्षात असं काय घडलं की बिनशर्त पाठिंबा. सगळं दबावतंत्र सुरू असल्याचे आरोप दमानिया यांनी केला आहे. लोक सरळ-सरळ बघत आहेत इतके वेडे देखील नाहीत, त्यामुळे ते ट्रोल होणार म्हणजे होणारच असं दमानिया यांनी म्हटलं आहे.

इंजिन गंजले : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी तर मनसेला खोचक टोला लगावला आहे. एखादे यंत्र वापरात असलं नाही तर गंजतं.
तशा प्रकारे मनसेच्या इंजनाचा राजकीय पटलावर वापर झाला नसल्यामुळे ते इंजिन गंजलं असल्याचं म्हणाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोशल मीडियावर ट्रोल
ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे यांनी ट्विटच्या माध्यमातून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मन माझं त्यात, मी नाही खात,
काय नाही त्यात?
तर गूळ नाही त्यात

हेही वाचा :

1 मुंबईत एका वर्षात आढळले 4 हजार 66 क्षयरोग बाधित किशोवयीन रुग्ण; पालिकेच्या उपाययोजनांचा बोजवारा? - Tuberculosis Patient

2 महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार धनुष्यबाणावरच लढणार - उदय सामंत - Lok Sabha Elections 2024

3 राजकारणातील चाणक्यानं फेकला शेवटचा पत्ता, धैर्यशील मोहिते पाटील 13 एप्रिलला शरद पवार गटात करणार प्रवेश - loksabha election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.