ETV Bharat / state

गेल्या सात महिन्यात मुंबई पोलिसांना आले 35 हॉक्स कॉल - Hoax Caller

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 2, 2024, 1:27 PM IST

Hoax Caller गेल्या वर्षभरापासून मुंबई पोलिसांना धमकीचे वारंवार फोन येत आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. जानेवारी ते जुलै दरम्यान मुख्य पोलीस नियंत्रण कक्षाला 35 धमकी देणारे हॉक्स कॉल्स आल्याची माहिती समोर आली आहे.

Hoax Caller
Hoax Caller (ETV Bharat Reporter)

मुंबई Hoax Caller: दिवसेंदिवस मुंबई इथं हॉक्स कॉलद्वारे धमकवण्याच्या घटनामध्ये वाढ होत आहे. मंगळवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास मरीन लाइन्स इथल्या ओबेरॉय हॉटेलवर अतिरेकी हल्ला होणार असल्याची माहिती अज्ञात कॉलरनं दिली. त्यामुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली. तपासणी दरम्यान अज्ञात कॉलर मध्य प्रदेशातील आढळून आला. कॉलर मनोरुग्ण असल्यानं त्याला अटक करण्यात आलं नाही. गेल्या वर्षीपासून मुंबईत हॉक्स कॉल येण्याचं सत्र सुरुच आहे. जानेवारी ते जुलैपर्यंत 35 वेळा मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला धमक्या देणारे कॉल्स आले. यामुळे मुंबई पोलिसांनी अक्षरशः कंबर कसली आणि हॉक्स कॉल करणाऱ्या कॉलरच्या मुसक्या आवळल्या.

जानेवारी ते जुलै या महिन्यामध्ये मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती देणार 28 धमकी कॉल्स आले. तसंच दहशत पसरवणारे पाच ईमेल आणि सोशल मीडियाद्वारे दोन वेळा मुंबई शहरात बॉम्ब ठेवल्याची खोटी माहिती देण्यात आली. याबाबत गुन्हगारी गुप्तवार्ता पथकानं तपास केला आणि संबंधित अज्ञात कॉलर्स यांच्या मुसक्या आवळल्या. अज्ञात कॉल्समध्ये तीन मनोरुग्ण तर दोघांनी दारुच्या नशेत हे कृत्य केल्याचं आढळून आलंय. त्याचबरोबर दोन लहान मुलांनी अजाणतेपणे कॉल केल्याचं निदर्शनास आलं आहे. तसंच शहरात दहशत पसरवण्याच्या दृष्टीनं दोन कॉल ठरवून करण्यात आले होते. या दोघांना अटक करण्यात आलं. 15 प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तर काही प्रकरणात अद्याप तपास सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

कधी आणि कुठं आले धमकीचे कॉल : 5 जानेवारी रोजी भायखळा इथल्या भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालय इथं ईमेल द्वारे वस्तुसंग्रहालयात स्पोटकं असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, तपासात आसाममधील अल्पवयीन मुलानं हे कृत्य केल्याचं उघडकीस आलं. 13 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला तामिळनाडू नियंत्रण कक्षातून माहिती देण्यात आली की, अतिरेकी मुंबईमध्ये घुसले असून बॉम्ब ठेवून गेले. याप्रकरणी एसओपी प्रमाणं कारवाई करण्यात येत आहे. अज्ञात कॉलरनं वर्च्युअल नंबर वापरल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. 14 जानेवारी रोजी पोलीस महासंचालक नियंत्रण कक्षाला आणि मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कॉलरनं कॉल करुन मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती दिली.

इंडिगो एअरलाइन्स प्लाईट प्रकरण : 27 जानेवारी रोजी विमानतळ पोलीस ठाणे यांनी दूरध्वनी वरुन माहिती दिली की, मुंबई ते लखनऊ या इंडिगो एअरलाइन्स फ्लाईटमधील एका सीट खाली बॉम्ब ठेवला आहे. त्यामुळे उड्डाण पुढं ढकलून विमानाची सुरक्षा तपासणी करण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल केला. 2 फेब्रुवारीला वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला व्हाट्सअपद्वारे 'हमने मुंबई में 6 जगह बॉम्ब लगाये है' असा संदेश पाठवण्यात आला. हा चॅट संदेश पाकिस्तानातून करण्यात आला. याबाबत वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन तपास सुरु आहे.

राम मंदिरावर हल्ला करणारा फोन : 4 फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या हेल्पलाइनला कॉलरनं फोन करुन कळवलं की, आग्रा येथील रहिवासी राम मंदिरावर हल्ला करणार आहे. याप्रकरणी आझाद मैदान पोलिसांनी अ दखलपात्र गुन्हा दाखल करुन आरोपीवर कारवाई केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज सोशल मीडियावर आला होता. याप्रकरणी एक्स युजरला पुण्यातून ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या कक्षाकडं देण्यात आलं. 12 फेब्रुवारीला एका मनोरुग्णानं मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल करुन शरद पवार यांना उडवणार असल्याची माहिती देण्यात आली.

मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट उडवणार असल्याचा हॉक्स कॉल: 18 मे रोजी एका मोबाईल क्रमांकावरुन मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल आला. त्यानं बेस्ट रुट 351 ने प्लाझा ते सिद्धिविनायक असा प्रवास करत असताना दोन प्रवासी हिंदीत मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट उडवणार असल्याची माहिती देण्यात आली. याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली. तेव्हा चेष्टा आणि मस्करीतून हे कृत्य घडवलं असल्याचं निष्पन्न झालं. 27 मे रोजी वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका मोबाईल क्रमांकावरून 'परे मुंबई को उडा दिया जायेगा, मुंबई के ताज हॉटेल में बॉम्ब लगा है, और एअरपोर्ट पर बॉम्ब लगा है' अशी खोटी माहिती देण्यात आली. याप्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीला अद्याप अटक करण्यात आलं नाही. 17 जून रोजी हिरानंदानी हॉस्पीटल पवई इथं संशयित बॅग सापडली आहे, असा ईमेल पाठवण्यात आला. 18 जून रोजी 'महापालिका आयुक्त यांच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आला असून लवकरच ते बॉम्ब फुटणार, प्रत्येक जण मरेल.' असा ईमेल प्राप्त झाला होता. याप्रकरणी आझाद मैदान पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल असून पोलीस पुढील तपास करत आहे.

हेही वाचा

  1. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य दादर रेल्वे स्थानकावर येणार, दारूच्या नशेत पोलिसांना केला हॉक्स कॉल - Kalyan GRP Police
  2. दरभंगाहून दिल्लीला जाणार्‍या स्पाईसजेटच्या विमानाला बॉम्बनं उडवण्याचा फोन; विमानतळावर हाय अलर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.