ETV Bharat / state

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत वाद, निलेश राणेंचा उदय सामंतावर गंभीर आरोप - Controversy in Mahayuti - CONTROVERSY IN MAHAYUTI

Controversy in Mahayuti : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील नेत्यांकडून परस्परांवर आरोप केले जात आहेत. मात्र, काही अल्पसंतुष्ट नेत्यांकडूनच असे आरोप होताय. महायुतीतील शिवसेना-भाजपा यांच्यात कुठलीच दरी नसल्याचा दावा, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

Nilesh Rane, Uday Samant File Photo
निलेश राणे, उदय सामंत फाईल फोटो (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 7, 2024, 6:28 PM IST

मुंबई Controversy in Mahayuti : लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यातील अनेक मतदारसंघात धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. काही मतदारसंघांमध्ये आपल्या सहकारी पक्षांनी मदत केली नाही, त्यामुळंच आपला पराभव झाला, असा दावा महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजपाचे सरचिटणीस निलेश राणे यांनी उदय सामंत यांच्यासह त्यांच्या बंधूवर मदत न केल्याचा आरोप केला आहे. सामंत यांच्यामुळचं मताधिक्य घटल्याचा दावा निलेश राणे यांनी केलाय. दुसरीकडं शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी राज्यातील चार ते पाच मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मदत केली नसल्याचा दावा केलाय. त्यामुळं आम्हाला पराभव पत्करावा लागला, असा आरोप त्यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीतील शिवसेना-भाजपा या पक्षांमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येत आहे. त्यामुळं आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

राज पुरोहित, डॉ. राजू वाघमारे यांची प्रतिक्रिया (Reporter ETV BHARAT Maharashtra)

पराभवानंतर लिंबू टिंबू काहीही बोलतात : लोकसभा निवडणुकांच्या निकालावर आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत. यामध्ये कुणी काम केलं, कुणी केलं नाही याबाबत सविस्तर चर्चा सुरू आहे. केवळ काही जण प्रसारमाध्यमासमोर येऊन अनावश्यक आरोप करत आहेत, अशा शब्दात भाजपाचे नेते राज पुरोहित यांनी आपल्याच पक्षातील सहकारी नेत्यांचे कान टोचले आहेत. मात्र, विजयाचं श्रेय घेतात पराजयाला कुणीही वाली नसतो. त्याप्रमाणं जिथं पराभव झाला तिथं मतदान कमी झालं, अशा ठिकाणी दुसऱ्याला दोष देणं योग्य नाही. वस्तुस्थिती स्वीकारून काम केलं पाहिजं, असं पुरोहित म्हणााले. मात्र, शिवसेना-भाजपात कोणताही वाद नाही. आम्ही एकत्र काम करीत आहोत, यात कुठलीही बाधा येणार नाही, असंही राज पुरोहित यांनी सांगितलं.

काम न करणाऱ्यांवर कारवाई : या संदर्भात बोलताना शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे म्हणाले, पक्षविरोधा कारवाई केल्याच्या काही तक्रारी आमच्याकडं आल्या आहेत. काही मतदारसंघांमध्ये सहकारी पक्षांनी काम केलं नाही, असा आरोप होतोय. या तक्रारींची चौकशी आम्ही करून त्यानुसार संबंधितांवर कारवाई करू. मात्र, सरसकट आमच्या सहकारी पक्षांनी काम केलं नाही, असं म्हणता येणार नाही. शिवसेना-भाजपा या दोन्ही मित्र पक्षांनी तसंच राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांनी निवडणुकीत चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिलाय. त्यामुळंच आम्हाला काही ठिकाणी चांगलं, यश मिळवता आलं. आम्ही 'एनडीए'चे घटक पक्ष आहोत. आम्ही 'एनडीए'सोबतच राहणार आहोत. त्यामुळं महायुतीत कोणत्याही पद्धतीचा बेबनाव नाही. आम्ही आगामी निवडणुकांमध्येसुद्धा चांगली कामगिरी करु असा दावा वाघमारे यांनी केला आहे.

हे वाचलंत का :

  1. उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्याचे भाजपाचे प्रयत्न; शिवसेनेचे सहा आमदार करणार घरवापसी? - Lok Sabha Election Results 2024
  2. 'मैं उस माटी का वृक्ष नहीं, जिसको नदियों ने सींचा है,..'; पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मुख्यमंत्री शिंदेंची कविता, दिला जाहीर पाठिंबा - NDA Meeting
  3. विदर्भात महायुतीचं अपयश कशामुळं? काय असतील कारणं? वाचा... - LOKSABHA ELECTIONs 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.