ETV Bharat / state

भाजपच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू, महायुतीच्या पराभवाला नेमकं जबाबदार कोण? - Lok Sabha elections - LOK SABHA ELECTIONS

Controversy between BJP : लोकसभा निवडणुकीत दारून पराभव झाल्यानंतर भाजपातला अंतर्गत वाद बाहेर येत आहे. राज्यात फक्त 9 जागांवर विजय मिळवल्यामुळं पराभवाचं खापर एकांमेकांवर फोडण्यास सुरवात झाली आहे. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधून मोकळं करण्याचं वक्तव्य केल्यानंतर नेमकं पराभवाला जबाबदार कोण, अशी चर्चा सुरू आहे.

Controversy between BJP
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार (ETV BHARAT MH Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 6, 2024, 10:51 PM IST

मुंबई Controversy between BJP : राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झालाय. त्यामुळं पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी स्वीकारली असून नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा देण्याचं म्हटलं आहे. तर, दुसरीकडं भाजपा नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करून वादाला तोंड फोडलं आहे. सिर्फ एक आदमी की लाईन छोटी करने, के चक्कर में पार्टी का नुकसान किया, असं मोहित कंबोज यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. मोहित कंबोज यांचा निशाणा नक्की कुणाकडं आहे, हे अजून गुलदस्त्यात आहे. मोहित कंबोज देवेंद्र फडवणीस यांचे निकटवर्तीय आहेत. आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यानचे वक्तव्य भाजपाला भारी पडल्याचं म्हटलं जात आहे. यावरून आता भाजपामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे.

मंत्री, भाजपाच्या पराभवाला जबाबदार : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज्यात 22 जागा जिंकणाऱ्या भाजपानं यंदा फक्त 9 जागावर विजय मिळवलाय. तसंच महायुतीला 17 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळं या पराभवाची नैतिक जबाबदारी देवेंद्र फडवणीस यांनी स्वीकारत सरकारमधून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलीय. उपमुख्यमंत्री पदावरून माला मोकळं करावं, असं फडणवीस यांनी म्हटलंय. परंतु राज्यात झालेल्या पराभवाला एकटे देवेंद्र फडवणीस जिम्मेदार आहेत का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय नेत्यानं उपस्थित केलाय. याबाबत भाजपा नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत या विषयाला तोंड फोडलंय. यासाठी महाराष्ट्रातील भाजपा तसंच मुंबई भाजपा यांना वास्तव तपासण्याची गरज असून या पराभवाची जिम्मेदारी कोण घेणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील मंत्री सुद्धा भाजपाच्या पराभवाला जबाबदार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही जबाबदारी केवळ देवेंद्र फडणवीस यांची नसून भाजाप नेत्यांची असल्याचं म्हटलं आहे.

राजकारणातून संन्यास घेण्याची भाषा : महायुतीच्या पराभवानं भाजपाच्या पायाखालची वाळू सरकलीय. निकालापूर्वी प्रत्येक बाबतीत महाविकास आघाडीला टोमणे मांडणाऱ्या भाजपाला निकालानंतर जनतेनं त्यांची जागा दाखवलीय. विशेष म्हणजे देवेंद्र फडवणीस तसंच आशिष शेलार यांनीही निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारलीय. मुंबईत तर महायुतीच्या सहापैकी सहा जागा निवडून येतील, असा आत्मविश्वास त्यांनी दाखवला होता. राज्यात महाविकास आघाडीच्या 18 जागा जिंकून आल्यास राजकारणातून सन्यास घेणार असल्याचं शेलार म्हणाले होते. आता याच मुद्द्यावर उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते अरविंद सावंत, सुषमा अंधारे यांनी आशिष शेलारांना त्यांच्या वक्तव्याची आठवण करून दिली आहे.

शेलार तोंडघशी पडले : लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासोबत चार आमदार पूर्ण फेल झाले आहेत. आशिष शेलार यांच्या विधानसभा मतदारसंघात उज्वल निकम यांना थोड्याफार प्रमाणामध्ये आघाडी भेटली. मुंबईत सहा पैकी सहा जागा जिंकून आणण्याची भाषा करणाऱ्या आशिष शेलार यांना या निवडणुकीत तोंडघशी पडावं लागलं आहे. महाविकास आघाडीनं सहा पैकी चार जागा जिंकल्या आहेत. दक्षिण मध्य मुंबईतसुद्धा आमदार कॅप्टन तमिल सेलवन यांचा राहुल शेवाळे यांना फायदा झाला नाही. तिथं ते पिछाडीवर होते. मुंबई उत्तर पूर्व येथे राम कदम यांच्या मतदारसंघात मिहीर कोटेचाना फटका बसला. मुंबईत आशिष शेलार यांनी संपूर्ण ताकद लावली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकमेव रोड शो झालेल्या ठीकाणीही भाजपाचा पराभव झालाय. त्यामुळं या पराभवामुळं फडणवीसांना जबाबदार न धरता, सर्व नेत्यांची जबाबदारी असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

हे वाचा -

  1. चलो बुलावा आया है! लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर राणा दांपत्याला दिल्लीत बोलावणं, केंद्रात मंत्रिपद मिळणार? - Navneet Rana Ravi Rana Delhi Visit
  2. भाजपा आमदाराचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; म्हणाले... - Pravin Pote
  3. अपेक्षेपेक्षा अधिक जागा मिळाल्यानं काँग्रेससह शिंदेंच्या शिवसेनेची विधानसभेला बार्गेनिंग पॉवर वाढेल? - Maharashtra Assembly Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.