ETV Bharat / state

"सत्तेत आल्यानंतर राम मंदिराचं.... "; नाना पटोलेंचं आश्वासन - Nana Patole About Ram Temple

Nana Patole About Ram Temple: अहमदाबादमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस सत्तेत आल्यास राम मंदिर पाडणार, असं वक्तव्य केलं होतं. यावर नागपुरात बोलताना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्टीकरण दिलय. आम्ही सत्तेत आल्यास राम मंदिराचं शंकराचार्यांच्या माध्यमातून शुद्धीकरण करून राम लल्ला प्राणप्रतिष्ठापणेचा कार्यक्रम करू, असं ते म्हणाले.

Nana Patole About Ram Temple
नाना पटोले (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 10, 2024, 8:06 PM IST

नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार राम मंदिराविषयी आपले मत मांडताना (Reporter)

नागपूर Nana Patole About Ram Temple : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर आरोपांची सरबत्ती केली आहे. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत पराभव आता स्पष्ट दिसू लागल्याने पंतप्रधानांची भाषा बदलली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एखाद्या जिल्हा परिषदेचे सदस्य असल्यासारखे भाषण करत असल्याचा घणाघात विजय वडेट्टीवारांनी केला आहे. तर नरेंद्र मोदी हे खोटं बोलून प्रचार करत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय. हे दोन्ही नेते आज नागपुरात बोलत होते.

मंदिराचे शुद्धीकरण करू : भाजपा पूर्णपणे विचलित झालाय. राम मंदिर संदर्भात हेमंत बिस्वास तर बोललेच. मात्र अहमदनगरमध्ये पंतप्रधान देखील बोलले होते की, काँग्रेस राममंदिर पाडणार आहे; पण मी त्यांना सांगू इच्छितो की, केंद्रात आमचे सरकार आल्यावर आम्ही राम मंदिर तर चांगले करू; मात्र प्राणप्रतिष्ठापूर्वी चार शंकराचार्यानी जी भूमिका घेतली होती. आम्ही त्यांच्यासोबत आजही आहोत आणि त्यांच्या माध्यमातून राम मंदिराचे शुद्धीकरण करू आणि राम लल्ला प्राणप्रतिष्ठापणेचा कार्यक्रम करू असं देखील नाना पटोले म्हणाले आहेत.

पंतप्रधानांच्या तोंडी ही भाषा योग्य नाही : पंतप्रधान मोदी यांनी एका भाषणात बोलताना उध्दव ठाकरे नकली संतान असल्याचं वक्तव्य केलं आहे. यावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की त्यांचं वक्तव्य अतिशय हास्यास्पद आहे. बाळासाहेब ठाकरे यांना वरून आणावे लागेल आणि उद्धव ठाकरेंचा डीएनए तपासावे लागेल. एवढ्या खालच्या स्तराला जाऊन जर पंतप्रधान बोलत असतील तर काय म्हणाव? कुणाच्या मुलाबद्दल किंवा वडिलांबद्दल असा आक्षेप घेणे चुकीचं आहे. महाराष्ट्राची परंपरा नसून नरेंद्र मोदी या परंपरेला गालबोट लावत असल्याचा आरोप नानांनी केलाय. नरेंद्र मोदी म्हणून ठीक आहे; पण पंतप्रधान म्हणून योग्य नसल्याचं नाना पटोले म्हणाले आहेत.

उद्धव ठाकरेंना मोदींची ऑफर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवार यांना 'एनडीए'मध्ये येण्याची ऑफर दिली आहे. यासंदर्भात बोलताना नाना म्हणाले की पहिले घर तोडले, ब्लॅकमेल केलं, आता मोदींना हे मान्य करावचं लागेल की ते सत्तेत येऊ शकत नाहीत. म्हणून ते कधी उद्धव ठाकरे तर कधी शरद पवार यांना ऑफर देत आहेत. पहिल्या टप्प्यात निवडणूक झाल्यावर मोदींना पराभव दिसू लागलेला असल्याचं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं आहे. त्यांनी सर्वांत आधी प्रचारात मंगळसूत्र आणले. गाढवालाही आणलं. नंतर हिंदू-मुस्लिम करण्याचा प्रयत्नही झाला. राम मंदिर झाले आता अडाणी-अंबानी आले आहे. आता पंतप्रधान जिल्हा परिषदच्या एखाद्या सभापती विषयी बोलत आहेत. देशाची मान शरमेने खाली जावे, अशी भाषा ते बोलत आहे. पण जनतेने जुमलेबाजी सरकारला हटवायचे असा निर्णय घेतला आहे. लोकांचा रिस्पॉन्सचं मिळत नसल्याचं ते म्हणाले आहेत.

हा तर बाळासाहेबांचा घोर अपमान- वडेट्टीवार : बाळासाहेबांचा राज्यात दरारा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधी उद्धव ठाकरे यांचा पक्ष नकली असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता ते उद्धव ठाकरे नकली संतान असल्याचं म्हणत आहेत. हा त्या आई-वडिलांचा अपमान आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीनी एकप्रकारे त्यांना शिवी दिली असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. त्यांची पातळी एवढी घसरली की, ते जर आई वडिलांना अपमान करत असेल तर आता जनता त्यांना उत्तर देईल.

हेही वाचा:

  1. पक्ष विलिन न करता एनडीएत सहभागी व्हावं; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शरद पवार यांना ऑफर - Pm Modi Offered To Sharad Pawar
  2. शिंदे गटात गेल्यानं महिला नेत्याला ठार मारण्याची धमकी; ठाकरे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल - Thackeray Group Leader Threat
  3. अरविंद केजरीवाल यांना 'सुप्रिम' दिलासा; सर्वोच्च न्यायालयानं दिला अंतरिम जामीन, लोकसभेचा प्रचारही करणार - Interim Bail To Arvind Kejriwal

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.