ETV Bharat / state

मणिपूरमधील 'शबरीं'चा अपमान झाला, तेव्हा पंतप्रधान चूप का, प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आज नंदुरबार इथं जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मणिपूरच्या महिलांवर अन्याय झाला, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाज का नाही उठवला, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला.

Lok Sabha Election 2024
काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 11, 2024, 1:20 PM IST

नंदुरबार Lok Sabha Election 2024 : "मणिपूरमध्ये झालेल्या घटनेच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह त्यांचा एकही मंत्री संसदेत बोलू शकला नाही. मणिपुरातील घटना रोखण्यासाठी गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठलंही पाऊल उचललं नाही, म्हणून मोठी घटना घडली," असा हल्लाबोल प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सभेत बोलताना 'मी शबरी मातेचा पुजारी आहे,' असं सांगितलं. मग मणिपूरमधील 'शबरी'चा अपमान झाला तेव्हा, पंतप्रधान मोदी चूप का होते," असा रोखठोक सवाल प्रियंका गांधी यांनी केला.

आदिवासी मंत्री हेमंत सोरेन यांना टाकलं कारागृहात : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रियंका गांधी यांनी नंदुरबार इथं सडकून टीका केली. "देशात एकमेव आदिवासी मुख्यमंत्री असलेल्या हेमंत सोरेन यांना देखील मोदी सरकारनं कारागृहात टाकलं आहे. हा एक प्रकारे आदिवासींवर अन्यायच आहे. आदिवासी नागरिकांसाठी जीवन समर्पित करणाऱ्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते नवीन संसदेचं उद्घाटन न केल्यानं त्यांचा अपमानच केला आहे. एकीकडं पंतप्रधान म्हणतात आदिवासींचा सन्मान करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, तर दुसरीकडं आदिवासींचा अपमान अशा प्रकारे केला जात आहे. जो खरंच सन्मान करतो, तो राजकीय फायद्यासाठी सन्मान करत नाही. नरेंद्र मोदी फक्त राजकीय फायद्यांसाठी सन्मान करत आहेत. महाराष्ट्रात सुमारे दोन लाख आदिवासींना वनपट्टे दिले गेले नाहीत, हा काय आदिवासींचा सन्मान आहे."

इंदिरा गांधींनी पाकिस्तानचे तुकडे केले : "ऑलम्पिकमधील खेळाडूंचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन्मान केला, मात्र जेव्हा खेळाडू रस्त्यावर बसले, त्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी घरातून बाहेर निघाले नाहीत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या उमेदवारांना भाजपाकडून उमेदवारी दिली गेली, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी का गुपचूप बसले," असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, मी एकटा भ्रष्टाचाराच्या विरोधात लढत आहे, मग पूर्ण सत्ता तुमची आहे तरी तुम्ही एकटे कसे, असंही त्यांनी यावेळी विचारलं. इंदिरा गांधी यांच्याकडून काहीतरी शिका. त्या दुर्गारूपी महिलेनं पाकिस्तानचे दोन तुकडे केले. किती महान लोकांनी पंतप्रधान पद सांभाळलं, त्या लोकांना लोकतंत्र समजलं. मात्र आज तुम्ही त्या पदाचा आदर खाली आणला."

हेही वाचा :

  1. गांधी कुटुंबाचे जावई बाप्पू उतरणार निवडणुकीच्या मैदानात; रॉबर्ट वाड्रा म्हणाले 'अनेक पक्षांच्या आहेत ऑफर' - Lok Sabha Election 2024
  2. रायबरेली मतदारांना सोनिया गांधींचे भावनिक पत्र, काय आहे राजकीय अर्थ?
  3. काँग्रसच्या स्थापनादिनीच प्रियंका गांधींच्या अडचणींत वाढ; ईडीच्या चार्जशीटमध्ये नाव, नेमकं प्रकरण काय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.