मुंबई Maratha Reservation Row : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. हे सर्वेक्षण 23 जानेवारी 2024 रोजी सुरू करण्यात आलं होतं. ते 1 फेब्रुवारी 2024 रोजी पूर्ण झालं आहे. हे सर्वेक्षण 9 दिवसांच्या कालावधीत 100 टक्के पूर्ण झाल्याचं बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आलं. या सर्वेक्षणासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं 30 हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. या कर्मचाऱ्यांनी सदर कालावधीत मुंबईतील सर्व विभागात घरोघरी जाऊन महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे सर्वेक्षण निर्धारीत कालावधीत पूर्ण केल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे.
मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण : राज्य मागासवर्ग आयोगाच्या निर्देशाप्रमाणं बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 23 फेब्रुवारी 2024 पासून बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत मराठा तसेच खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण सुरु करण्यात आलं होतं. नुकतंच हे सर्वेक्षण पूर्ण झालं आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 38 लाख 79 हजार 46 इतक्या घरांचं सर्वेक्षण करण्यासाटी सुमारे 30 हजार कर्मचारी कार्यरत होते. सर्वेक्षणाचं उद्दिष्ट गाठत 1 फेब्रुवारी 2024 रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मराठा आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाचं काम पूर्ण करण्यात आलं, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.
सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर : राज्य मागासवर्ग आयोगाने पाठविलेल्या ‘मास्टर ट्रेनर’नं बृहन्मुंबई महानगरपालिकेतील नोडल ऑफीसर, असिस्टंट नोडल ऑफीसर आणि मास्टर ट्रेनर यांनी महानगरपालिकेच्या कर्मचारी वर्गाला सर्वेक्षणासाठीचं प्रशिक्षण दिलं होतं. तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं होतं. सर्वेक्षणादरम्यान एकूण 160 ते 182 प्रश्न असून मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती प्रश्नावलीद्वारे भरुन घेण्यात आली. सदर माहिती मुलभूत, कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक, आरोग्य विषयक होती. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेण्यात आलेली नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा :