अमरावती Married Woman Abduction Case : विवाहितेला पळवून नेल्याने दर्यापूर तालुक्यात जातीय तणाव निर्माण झाला आहे. साक्षगंधासाठी आलेली विवाहित महिला दुसऱ्या दिवशी आपल्या सासरी जाणार होती. शनिवारी मध्यरात्री मात्र तिला विशिष्ट धर्माच्या युवकांनी पळवून नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणात एवढा पोलीस ठाण्यात रात्री तक्रार देण्यात आली. दरम्यान आमच्या मुलीला परत आणा, अशी मागणी करत महिलेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला होता.
भाजपाही आक्रमक : विवाहित महिलेला विशिष्ट धर्माच्या व्यक्तीने पळवून नेल्यामुळे दर्यापूर तालुका भाजपा आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. भाजपच्यावतीने रविवारी पोलिसांना निवेदन देऊन या प्रकरणात आरोपींवर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी करण्यात आली. या प्रकरणात आंदोलनाचा इशारा देखील भाजपासह एका संघटनेने दिला आहे.
तपासाला वेग : या प्रकरणात पोलिसांनी दोन पथके आरोपी आणि महिलेच्या शोधात पाठवले आहे. पोलिसांच्या दोन पथकांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक देखील संयुक्तरित्या आरोपीचा शोध घेत आहेत. या प्रकरणाचा छडा लवकरच लागेल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत असल्याची माहिती येवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे यांनी दिली.
मुलगी पळवल्याने वृद्धेला मारहाण : मुलगी किंवा विवाहिता पळून गेल्याने गावात तणाव निर्माण झाल्याची ही पहिलीच घटना नाही. डिसेंबर, 2022 मध्ये अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील ओझर गावात घडली होती. ज्यामध्ये नातवाने मुलगी पळवली म्हणून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली होती. विवेक उर्फ चवल्या पिंपळे यांच्यासह 2 आरोपीने ही मारहाण केली. गंगापूर फाट्यावर ही पारधी समाजाची महिला राहत होती. तिच्या नातवाने आरोपीच्या मुलीला 1 तारखेला पळवून नेले म्हणून शोधण्यासाठी हा व्यक्ती गंगापूर फाट्यावर आला. त्याच्यासह दोन जणांनी ही मारहाण केली. या प्रकरणी रात्री गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
गुन्हा दाखल : वृद्ध महिलेला ओझर येथील पारधी वस्तीवर आणल्यावर आरोपीने तिला मारहाण करायला सुरुवात केली. संतापजनक म्हणजे महिलेच्या अंगावरील सर्व कपडे काढून तिला नग्न करत मारहाण करण्यात आली. यावेळी पीडित वृद्ध महिला हात जोडत होती. दयेची भीक मागत होती. माझ्या मुलीला तुझ्या नातूने पळून नेले म्हणून वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण करण्यात आली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्या महिलेचा मारहाण करतानाचा व्हिडिओही केला. संतापजनक म्हणजे तयार केलेला व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरलसुद्धा केला.
हेही वाचा :
- "संजय राऊतांची सुरक्षा फक्त १५ मिनिटं हटवाच अन्...."; नितेश राणेंचा हल्लाबोल - Nitesh Rane on Sanjay Raut
- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान; महाराष्ट्रातील 'या' 11 मतदारसंघांत होणार चुरशीची लढत - Lok Sabha Elections 4th Phase
- शरद पवार आणि उद्धव ठाकरे निवडणुकीनंतर...; प्रकाश आंबेडकरांचा सर्वात मोठा दावा - Lok Sabha Election 2024