ETV Bharat / state

गेल्या दोन महिन्यात दोन लाख कोटींचे एमओयू साईन-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - EKNATH SHINDE NEWS - EKNATH SHINDE NEWS

Eknath Shinde Thane Speech : ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात शनिवारी (21 सप्टेंबर) मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत ठाणे विकास परिषद आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगर क्षेत्रात राबविण्यात येत असलेले प्रकल्प आणि भविष्यातील विकास आराखड्याविषयी माहिती दिली.

CM Eknath Shinde says an officer becomes bigger when he comes to Thane
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 22, 2024, 7:27 AM IST

ठाणे Eknath Shinde Thane Speech : " महाराष्ट्र देशाचे पॉवर हाऊस होईल इतकी क्षमता महाराष्ट्रात असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. त्या अनुषंगानं सरकार बदलल्यावर अनेक इंडस्ट्री आल्या आहे. सहा महिन्यात महाराष्ट्र नंबर 1 वर आहे, ही मोठी उपलब्धी आहे. हे सर्व गेमचेंजर प्रकल्प असून महाराष्ट्र जीडीपीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. पायाभूत सुविधांमध्येही महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे," असे प्रतिपादन मुखमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. शनिवारी (21 सप्टेंबर) ठाणे-मुंबई महानगर विकास परिषद 2024 ठाण्यात पार पडली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.

काय म्हणाले एकनाथ शिंदे? : ठाणे जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी उपलब्ध साधनसामग्रीचा कल्पकतेनं वापर करुन नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती शिंदेंनी दिली. तसंच पुढं ते म्हणाले, "पालघरला तिसरा एअरपोर्ट करत आहोत. वाढवण बंदर होत असल्यामुळं दावोसमध्ये 1 लाख 37 हजार कोटींचे एमओयू साइन केलं. तर गेल्या दोन महिन्यात दोन लाख कोटींचे एमओयू साईन केलेत. धर्मवीर आनंद दिघे यांनी ठाण्याच्या विकासाला आधार दिला. त्यांच्या जिल्ह्यात इतकी मोठी कॉन्फरन्स आयोजित केल्याबद्दल सर्वांचं धन्यवाद."

मुख्यमंत्री शिंदे कार्यक्रमातून निघाल्यानंतर महिलांनी केली विनंती (ETV Bharat Reporter)

विकासाच्या कामामध्ये आम्ही स्पीड ब्रेकर लावणारे नाही : पुढं विरोधकांवर टोलेबाजी करत शिंदे म्हणाले की, "मुंबई गोवा ॲक्सेस कंट्रोल रस्ता आपण करत आहोत. विकासाच्या कामामध्ये आम्ही स्पीड ब्रेकर लावणारे नाही. तर स्पीड ब्रेकर काढणारे आहोत. 15 वर्षे आंदोलन करून आपण क्लस्टर मंजूर केले. आता एसआरएचे रखडलेले प्रकल्प सुरू करणार आहोत. कोणाला वाटलंही नव्हतं की क्लस्टर होईल. काहींना वाटलं की क्लस्टर हे फक्त स्वप्न आहे. पण आता त्यांना कळतंय."

ठाण्यात आल्यावर अधिकारी मोठा होतो : "शासकीय अधिकारी ठाण्यात आल्यानंतर मोठा होतो. कारण ठाण्याचं एक असं वैशिष्ट आहे की, ठाण्याला सर्वप्रथम गोष्टी सुरू होतात. मग त्या सगळीकडं सुरू होतात," असं वक्तव्य मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर उपस्थित अधिकारी वर्गामध्ये एकच हशा पिकला.

मुख्यमंत्री निघाल्यानंतर महिलांनी केली 'ही' विनंती : कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्री निघाले असता अनेक दिवसांपासून पगार थकलेल्या महिलांनी मुख्यमंत्र्यांना विनंती केली. "आमचा पगार चार महिन्यांपासून थकला आहे. त्यासाठी कृपया आपण लक्ष द्यावं" अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली. त्यावर "कोणती कंपनी आहे? याविषयीची सर्व माहिती मला द्या. मी लगेच यावर कारवाई करून तुमच्या पगाराची व्यवस्था करतो", अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा -

  1. कोणताही उद्योग राज्याबाहेर गेला नाही, विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास करुन बोलावं : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल - CM DCM Slams Vijay Wadettiwar
  2. 'धर्मवीर'नंतर एकनाथ शिंदेंनाही 'मला काही सांगायचंय..'; नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला - CM Eknath Shinde
  3. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचं दर्शन - CM Eknath Shinde

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.