ETV Bharat / state

"सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प "; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक - Union Budget 2024 - UNION BUDGET 2024

Union Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात गरीब, महिला, शेतकरी, युवा, विद्यार्थी यांच्यासाठी भरीव घोषणा केल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं.

Budget 2024
महायुतीकडून अर्थसंकल्पाचं स्वागत (Source - ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 23, 2024, 5:29 PM IST

मुंबई Union Budget 2024 : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शेअर बाजारात मोठी पडझड दिसून येत आहे. या अर्थसंकल्पावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका होत असताना, सत्ताधाऱ्यांनी मात्र या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं आहे. दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे.

सर्व घटकांना प्रोत्साहन देणारा अर्थसंकल्प : अर्थसंकल्पात कररचनेत बदल केल्यामुळे विरोधकांकडून टीका होत असताना, मुख्यमंत्र्यानी कररचनेतील बदलाचं स्वागत केलं आहे. "कररचनेत मोठे बदल करून सर्वसामान्यांना दिलासा देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी देशवासियांचा विश्वास सार्थ ठरविला. केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प शेतकरी, महिला, युवा, कौशल्य विकास, रोजगार, पायाभूत सुविधांची उभारणी, शहरांचा विकास अशा विविध नऊ घटकांवर लक्ष केंद्रीत करणारा आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना दिलासा देणारा आहे." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

पायाभूत सुविधांना प्राधान्य... : "अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना बळ मिळालं आहे. कृषी व संलग्न क्षेत्रासाठी एक 1.52 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसंच महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी 'डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर' पुरवण्याचा सरकारनं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतीतील उत्पादन वाढवण्यास मदत होणार." असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

ग्रामीण भागाचा कायापालट : अर्थसंकल्पाlत ग्रामीण भारताच्या विकासासाठी 2.66 लाख रुपये कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच युवांसाठी 50 लाख अतिरिक्त रोजगार निर्माण करण्याचा निर्णयही अर्थसंकल्पातून मांडण्यात आला. याव्यतिरिक्त महत्त्वाचं म्हणजे पायाभूत सुविधांसाठी 11 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे हा अर्थसंकल्प तळागाळातील लोकांना आणि शेवटच्या घटकांना दिलासा देणारा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पाचं कौतुक : "लाभार्थ्यांच्या खात्यात 40 लाख कोटी थेट जमा करण्याचं काम मोदी सरकारनं केलं आहे. शेतकरी, महिला, युवा, गरीब या चार घटकांना नजरेसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. रोजगार क्षेत्रामध्ये महाराष्ट्र सरकारने अप्रेंटिस ची एक स्कीम चालू केली त्या धर्तीवर आता केंद्र सरकारनं सुद्धा स्कीम चालू केली आहे. सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणार आहे. 100 नवीन क्लस्टर तयार करण्याचं काम केंद्र सरकारनं हाती घेतल्यामुळं त्याचा फार मोठा फायदा होणार. ग्रामविकास क्षेत्रामध्ये दोन लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक केंद्र सरकार करणार आहे. जनजाती उन्नत ग्राम विकास अभियान आदिवासी लोकांसाठी घेण्यात आलं आहे. पायाभूत सुविधांमध्ये 11 लाख कोटींची गुंतवणूक फार मोठ उद्दिष्ट आहे." असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं स्वागत : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी तीन सरकारमधील पहिला अर्थसंकल्पात संसदेत मांडला त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सदर अर्थसंकल्प हा महाराष्ट्र आणि देशवासीयांचं मन जिंकणार आहे. विकासित भारताची पायाभरणी करणारा आणि विश्वशक्तीच्या वाटेवर नेणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हटल आहे. शहरी आणि ग्रामीण विकासाचा समतोल राखत समाजातील सर्वच घटकांचा समावेश असलेला अर्थसंकल्प आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा अभिनंदन देखील केला आहे. या अर्थसंकल्पामुळे देशवासीयांचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर अधिकच दृढ झाला आहे."

देशवासियांची मनं जिंकणारा अर्थसंकल्प : "सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मनं जिंकणारा अर्थसंकल्प ठरला. सर्व क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा, मजबूत-विकसित भारताची पायाभरणी करणारा, देशाला विश्वशक्ती बनवण्याच्या वाटेवर नेणारा हा अर्थसंकल्प आहे. शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधणारा, समाजातील दुर्बल, वंचित, मागास, अल्पसंख्याक घटकांच्या विकासावर भर देणारा अर्थसंकल्प सादर केला." अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं.

हेही वाचा

  1. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली विकसित भारताच्या 9 प्राधान्यक्रमांची माहिती - Nirmala Sitharaman budjet news
  2. अर्थसंकल्पात युवकांसाठी 'पंतप्रधान पॅकेज'; पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या तरुणांना सरकारकडून मिळणार 15000 रुपये - India Budget 2024
  3. 1 कोटी कुटुंबांना मिळणार दरमहा 300 युनिट मोफत वीज! कोणाला मिळणार फायदा? - India Budget 2024
  4. देशातील महिलांच्या विकासाला वाव देणारा अर्थसंकल्प- ज्योती दोशी - Union Budget 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.