ETV Bharat / state

उमेदवारीबाबत मुख्यमंत्र्यांचा छगन भुजबळांना आला होता फोन; पण.... - Lok Sabha election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत मोठा गौप्यस्फोट केला. "मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवता का? असं विचारलं होतं. मात्र, नाशिक सोडून जाण्याचा प्रश्नच येत नाही," असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbal
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 25, 2024, 5:45 PM IST

छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

नाशिक Chhagan Bhujbal : नाशिक लोकसभेवरुन सध्या महायुतीत रस्सीखेच सुरू आहे. "नाशिकमधून माझी उमेदवारी फायनल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला फोन करून शिरूरमधून लढता का? असं विचारलं. शिरूरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे, असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं होतं. मी शिरूरमधून निवडणूक लढवली, तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती, असा त्यामागे हेतू होता, मात्र, मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच येत नाही," असं छगन भुजबळ यावेळी म्हणाले. असा दावाही याआधी खासदार अमोल कोल्हे यांनी केला होता. त्यावरुन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिलंय.

मी नाशिकसाठी काम करणार : "माझ्या तोंडात चुकीचे शब्द घालू नका. मी कशाला तिकडं जाईन. मी मुख्यमंत्र्यांना दोष देत नाही, भुजबळ हे नाव नाशिकसाठी दिल्लीतून फायनल झालं होतं. पण, मुख्यमंत्री शिंदे यांना अडचण होती. त्यांना नाशिकची जागा हवी होती, म्हणून त्यांनी मला शिरुरमध्ये ओबीसी, माळी समाज जास्त आहे, तुम्ही तिथून लढता का?, असं विचारलं होतं. त्यांचा हेतू स्पष्ट होता, मी तिकडं गेलो तर नाशिकचा तिढा सुटेल, पण मी सांगितलं की ओबीसी समाज महाराष्ट्रभर आहे. माझा संबंध नाशिकशी आहे, मी नाशिकचा पालकमंत्री आहे. त्यामुळं या पुढे मी नाशिकसाठी काम करत राहणार," असं मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

नाशिकसाठीच काम करणार : "नाशिक सोडून मी कुठेही उभा राहणार नाही. त्यामुळं शिरूरला लढण्याचा प्रश्नच येत नाही. पक्षानं सांगितलं म्हणून मी नाशिकला तयार झालो होतो. मला तशी अनेक ठिकाणी मागणी होती. सभा जिथे जिथे झाल्या तिथून उभे राहा, अशी मागणी होती. पण नाशिक मिळालं, तर ठीक नाहीतर नाशिकसाठी काम सुरू आहे," असंही भुजबळ यांनी स्पष्टपणं सांगितलं.

वडेट्टीवार यांचे आभार मानतो : "नाशिकमध्ये भुजबळांना उमेदवारी मिळाली असती, तर ते निवडून आले असते, असं वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळं मी त्यांचा आभारी आहे. मला नाशिकमधून उमेदवारी दिली असती, तर मी निवडून आलो असतो. प्रत्येकजण सांगतोय नाशिकचं वातावरण चांगलं आहे. निवडून आलो असतो पण, जर तर ला अर्थ नाही. वडेट्टीवारांनी दाखवलेल्या विश्वासाबाबत आभारी आहे. प्रत्येक पक्षाच्या अडचणी असतात. ते विरोधी पक्ष नेते आहेत. कधी प्रेम व्यक्त करत असतात, तर काहीजण खरं प्रेम व्यक्त करतात," असं छगन भुजबळ म्हणाले.

भुजबळांचा पंकजा मुंडेंना सल्ला : बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उमेदवारी देण्याबाबत वक्तव्य केलं होतं. यावरही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली. "आमच्याकडं उमेदवार नाहीत अशी अडचण नाही. खूप उमेदवार आहेत ही आमची अडचण आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये लक्ष द्यावं, सर्वांना सोबत घ्यावं. त्यांनी निवडून येणं महत्त्वाचं आहे," असा सल्ला भुजबळांनी पंकजा मुंडेंना दिला.

हे वाचलंत का :

  1. आता लगबग मतदानाची: यंत्रणा लागली कामाला; कर्मचाऱ्यांना साहित्याचं वाटप, उद्या होणार मतदान - Lok Sabha Election 2024
  2. बारामतीत 'तुतारी' चिन्हावर दोन उमेदवार रिंगणात; काय आहे नेमका मॅटर? - Lok Sabha Election 2024
  3. अग्नीवीरसह कंत्राटी नोकर भरती रद्द करणार...राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षानं जाहीरनाम्यात काय दिली आहेत आश्वासनं? - NCP SCP releases manifesto

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.