अहमदनगर CM Eknath Shinde : राजस्थान, तेलंगाणामध्ये जिंकले त्यावेळी ईव्हीएम मशीन बरोबर होते. ज्यावेळी विरोधक हरतात त्यावेळी ईव्हीएम मशीनवर आक्षेप घेतात, अशी दुटप्पी भूमिका विरोधक घेत असल्याचा टोला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांना लागवलाय. ऊन, वारा न पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 तास काम करतात. राहुल गांधी थोडे गरम झाली की, परदेशात थंड हवा खाण्यासाठी जातात, असाही टोला यावेळी शिंदेंनी राहुल गांधींना लागवलाय.
सरकार टिकवण्यासाठी अनेकांवर कारवाई केली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज (26 एप्रिल) शिर्डी दौऱ्यावर आहे. दरम्यान शिर्डी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सरकार वाचवण्यासाठी कंगना राणावत, राहुल जोशी, नारायण राणे यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई केली गेलीय. आणखीन काही लोकांना तुरुंगात टाकून सरकार वाचवायचे होते. हे जगजाहीर होते असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहे.
शिंदे ऑन राऊत : पळपुट्या लोकांना बोलण्याचा अधिकार नाही. एकनाथ शिंदे जे करतो ते खुल्या मनाने करतो. मी कुठल्याही भीतीपोटी भाजपा बरोबर गेलेलो नाही. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील निर्णय आम्ही घेतला आहे. शिवसेना वाचवण्यासाठी निर्णय घेतला. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी आम्ही भाजपा बरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती देऊन खुर्ची मिळवण्यासाठी विचारांची प्रताडणा केली असल्याचा टोला यावेळी शिंदेंनी संजय राऊतांना लागवलाय.
संजय राऊतांची अजित पवारांवर टीका : निवडणूक आयोग हा निवडणूक आयोग नसून भाजपाची शाखा आहे. निवडणूक आयोगाकडून निष्पक्ष कामाची अपेक्षा करणं चुकीचं आहे. अजित पवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर निवडणूक आयोगानं दिलेल्या क्लीनचीटवर बोलताना संजय राऊतांनी शिर्डीत अजित पवारांचे कान टोचले.
तर घटनात्मक संस्थांची फेररचना करू : खासदार संजय राऊत आज शिर्डी दौऱ्यावर आहे. या दौऱ्या दरम्यान संजय राऊत यांनी शिर्डीत येऊन साईबाबांच्या मंदिरात जाऊन साईसमाधीचे दर्शन घेतलंय. साईबाबांच्या दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, हा निवडणूक आयोग नसून भाजपाची शाखा आहे. केंद्रात आमचे सरकार आल्यानंतर ज्या घटनात्मक संस्था आहे त्यांची फेररचना केली जाईल. संविधानाला मानणाऱ्या संस्थानकडून काम करून घेतल्या जाईल. यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप नसेल, असेही संजय राऊत म्हणाले आहे.
आमचे फोन टॅप केलेत : केसांपासून तर नखांपर्यंत फडणवीसांचा खोटारडेपणा आणि भ्रष्टाचार आहे. आपल्या सत्तेच्या काळात त्यांनी दिल्ली पासून महाराष्ट्रात लोकांवर खोटे गुन्हे दाखल करत त्रास दिला आहे. आता यांना भीती वाटत आहे. विरोधकांना तुरुंगात घालण्यापासून तर बेकायदेशीरपणे आमचे फोन टॅपिंग केलेय, असेही यावेळी संजय राऊत म्हणाले आहे.
हेही वाचा:
- नवनीत राणांनी केलं मतदान; सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएमबाबत दिलेल्या निर्णयावर दिली 'ही' खास प्रतिक्रिया - Lok Sabha Election 2024
- ना वीज, ना रस्ता, ना पिण्यास पाणी; मेळघाटातील चार आदिवासी गावातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार - Lok Sabha Election 2024
- नांदेड जिल्ह्यात रामतीर्थ मतदान केंद्रात युवकाने फोडलं ईव्हीएम मशीन - Lok Sabha Election 2024