ETV Bharat / state

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरण: मुख्यमंत्र्यांनी गठीत केली संयुक्त तांत्रिक समिती, नौदलाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश - Chhtrapati Shivaji Maharaj Statue

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 29, 2024, 8:07 AM IST

Chhtrapati Shivaji Maharaj Statue : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानं मोठी नामुष्की ओढवली आहे. या प्रकरणावरुन राज्यभर मोठा संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संयुक्त तांत्रिक समिती गठीत केली. ही समिती पुतळा का पडला, याची कारणं शोधणार आहे.

Chhtrapati Shivaji Maharaj Statue
संपादित छायाचित्र (ETV Bharat)

मुंबई Chhtrapati Shivaji Maharaj Statue : मालवण तालुक्यातील राजकोट इथल्या किल्ल्यावर बारतीय नौदलानं उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानं मोठं राजकारण तापलं आहे. बुधवारी उबाठा युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी मालवणला भेट दिल्यानंतर मोठा उबाठा आणि राणे समर्थकांमध्ये मोठा राडा झाला. त्यानंतर महाविकास आघाडी आणि सरकारमधील राजकारण आणखी तापलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याप्रकरणी तत्काळ उपाययोजना आखण्यासाठी बुधवारी रात्री वर्षावर बैठक आयोजित केली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा का पडला याचं कारण शोधण्यासाठी एक संयुक्त समिती गठीत केली आहे. या समितीत सिव्हिल इंजिनीअर, तज्ज्ञ, आयआयटी आणि नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा का पडला, यासाठी संयुक्त समिती : मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वाऱ्याच्या बेफाम वेगामुळे कोसळल्याची कारण राजकारण्यांनी दिलं. त्यामुळे राज्यात मोठा गोंधळ निर्माण झाला. महाविकास आघाडीनं राजकोट किल्ल्यावर आंदोलन केल्यानं या प्रकरणाला राजकीय वळण मिळालं. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षावर तातडीनं बैठक बोलावून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा का पडला, याची कारणं शोधण्यासाठी तांत्रिक समितीचं गठण केलं आहे. या समितीत सिव्हिल इंजिनीअर, तज्ज्ञ, आयआयटी आणि नौदल अधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे. ही तांत्रिक संयुक्त समिती नेमण्यात आल्यानं आता पुतळा का पडला, याची कारणं पुढं येतील.

हेही वाचा :

  1. "छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन..."; देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना आवाहन - Chhatrapati Shivaji Maharaj Statue
  2. मालवणमधील महाविकास आघाडीचं आंदोलन चिघळलं; राजकोट किल्ल्यावर राणे समर्थक आणि ठाकरे गटात तुफान राडा - UBT And Rane Activist Dispute
  3. आठ महिन्यात पुतळा पडतोच कसा, न्यायाधीशांच्या नेतृत्वात एसआयटी चौकशी करा; संजय राऊतांची मागणी - Shivaji Maharaj Statue Incident
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.