मुंबई Yoga Day Celebration News : 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला योगसाधनेचं महत्व पटवून देत 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याची मान्यता मिळवून दिली. आज हा दिवस जगभरात मोठ्या उत्साहानं साजरा केला जातोय. मुंबईमध्येदेखील आज अनेक ठिकाणी योग दिवस साजरा केला गेला. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया तसंच मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतला.
योग जीवनाचा अविभाज्य घटक : यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग साधनेला महत्व दिलं. त्यामुळं आज जगभरात योग दिन साजरा केला जातो. योग साधनेला आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनवलं पाहिजे. दररोज योगासनं केली तर त्याचा परिणाम आपल्या संपूर्ण शारीरिक क्षमतेवर होईल. योग साधनेचं महत्व मोदींनी संपूर्ण जगभराला दाखवून दिलंय. त्याच बरोबर 2015 पासून स्वच्छतेचं महत्वदेखील त्यांनी सर्वांना दाखवून दिलंय. त्याचा कित्ता आपण गिरवतोय. आज मंत्रालयाच्या वतीनं हा दिवस साजरा करण्यात येत आहे." तसंच 'करो योग, रहो निरोग' असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी जनतेला योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अतिशय प्राचीन अशी उपचार पद्धती : या कार्यक्रमात बोलत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 ला योगासनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्व मिळवून दिलं. 150 पेक्षा जास्त देशांनी या दिवशी योग साधना करण्याचा निर्णय घेतला. अतिशय प्राचीन अशा योगाला आज संपूर्ण जगानं स्वीकारलंय. आजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या शरीरावर जे काही दुष्परिणाम होतात. त्यावरचा रामबाण उपाय काही असेल तर तो 'योग' आहे."
हेही वाचा -
- आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष : आंतरराष्ट्रीय योगपटू धनश्री लेकुरवाळेनं दिला निरोगी आरोग्याचा कानमंत्र - International Yoga Day 2024
- 'आंतरराष्ट्रीय योग दिवस': 1200 विद्यार्थ्यांनी मेडिकल सिम्बॉलमध्ये मानवी साखळी तयार करत केली योग प्रात्यक्षिकं - International Yoga Day
- 'भिडू... योग करने का, मस्त रहने का' प्रसिद्ध अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुंबईकरांना संदेश - World Yoga Day