ETV Bharat / state

मीरा-भाईंदरमधील राड्याची देवेंद्र फडणवीसांकडून दखल, 13 जणांना अटक - देवेंद्र फडणवीस

Mira Bhayandar Clash : मीरा-भाईंदर येथे रविवारी रात्री झालेल्या राड्याची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली.

Mira Bhayandar Clash
Mira Bhayandar Clash
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 10:46 PM IST

मुंबई Mira Bhayandar Clash : मुंबईजवळील मीरा-भाईंदर येथे रविवारी (21 जानेवारी) एका वाहन रॅलीदरम्यान दोन समुदायांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे.

टोळक्यानं रॅली काढली : सोमवारी अयोध्येतील राम मंदिरात अभिषेक सोहळा पार पडला. या पार्श्वभूमीवर, रविवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास मीरा-भाईंदर पोलिसांच्या हद्दीतील नया नगर येथे 10 ते 12 जणांच्या टोळक्यानं तीन कार आणि मोटारसायकलवरून रॅली काढली होती. या टोळक्यानं प्रभू रामाच्या नावाची घोषणाबाजी सुरू केली. यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली : घोषणाबाजी करत असताना, काही व्यक्तींनी फटाके फोडले. त्यानंतर स्थानिक लोकांचा एक गट लाकडी दांडके घेऊन बाहेर आला. त्यांनी टोळक्यासोबत वाद घातला आणि त्यांच्या वाहनांवर हल्ला केला. एका पोलीस अधिकाऱ्यानं ही माहिती दिली आहे. यावेळी वाहनांवरून जाणाऱ्या लोकांनाही मारहाण करण्यात आली. पोलिसांनी तातडीनं हस्तक्षेप केल्यानं हल्लेखोर पसार झाले. यापुढे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, असं अधिकाऱ्यानं सांगितलं. यावेळी स्थानिक पोलिस कर्मचार्‍यांव्यतिरिक्त, दंगल नियंत्रण पोलिस (आरसीपी) ची एक पलटणही तैनात करण्यात आली होती.

देवेंद्र फडणवीसांचे कारवाईचे आदेश : नया नगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, हल्लेखोरांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेत दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणी आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली असून, सीसीटीव्ही फुटेजचं तपशीलवार विश्लेषण करून इतरांनाही अटक करण्यात येत आहे.

  • About the incident occurred last night at Mira Road :
    I took detailed info on what happened in NayaNagar in Mira Bhayender last night itself.
    Also was constantly in touch with Mira Bhayender CP till 3.30 am.
    Police were instructed to take strictest action against the culprits.…

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हे वाचलंत का :

मुंबई महसूल गुप्तचर विभागाची मोठी कारवाई! 4 किलो सोनं तस्करीत दोघांना केली अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.