ETV Bharat / state

मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला कोस्टल रोड पाणी गळतीचा आढावा - Coastal Road Water Leakage

Coastal Road Water Leakage : कोस्टल रोडच्या पाणी गळतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आढावा घेतला. मुंबईतील कोस्टल रोडवर काही ठिकाणी पाणी गळती झाली आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली करत मुख्य रस्त्याला कोणताही धोका नसल्याचं सांगितलं.

Chief Minister Eknath  Shinde
कोस्टल रोड पाणी गळतीचा आढावा घेताना मुख्यमंत्री (Reporter ETV Bharat MH)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 7:07 PM IST

मुंबई Coastal Road Water Leakage : मुंबईचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या मुंबई कोस्टल रोडच्या अंडरपासमध्ये गळती सुरू झाल्यानं महापालिकासह कोस्टल रोडचे कंत्राटी अधिकारी अडचणीत आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः कोस्टल रोडची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर बोलताना ते म्हणाले की, याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात आली असून भविष्यात अशा घटना घडू नयेत याकडेही लक्ष देण्यात आलं आहे.

इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राऊटिंग ही प्रक्रिया : मुंबई महापालिकेनं 14 हजार कोटी रुपये खर्च करून 10 किलोमीटरचा कोस्टल रोड तयार केला आहे. या प्रकल्पात 2 किमीचे 2 बोगदे सुरू करण्यात आले असून, त्यापैकी वरळी ते मरीन ड्राइव्ह मार्गिका सुरू करण्यात आली आहे. या मार्गिकेमधील एका बोगद्यातील जॉइंटमधून पाणी गळत आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना घेऊन परिसराची पाहणी केली. या पाहणीनंतर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, कोस्टल रोड सबवेमध्ये पाण्याची गळती सुरू झाल्याचं लक्षात आल्यानंतर मी तातडीनं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना फोन केला. त्यानंतर त्यांनी या प्रकल्पाचे प्रमुख अमित सैनी, अतिरिक्त आयुक्त, इलेक्ट्रिकचं पथक घटनास्थळी पाठवलं. आज मी इथे आलो आहे. येथे दोन-तीन भिंतींमध्ये पाण्याची गळती सुरू आहे. तसंच या भुयारी मार्ग तज्ञाची भेट घेतली आहे. दोन-तीन सांध्यांमधून पाणी गळती होत असली तरी दोन्ही बाजूला असे एकूण 50 सांधे आहेत. या 50 सांध्यांमध्ये, तज्ञांनी इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंगची प्रक्रिया करण्यास सांगितलं. या कामासाठी विशेष तंत्राचा वापर करण्यात येणार आहे. जे भुयारी मार्ग तज्ञ आहेत त्यांचीही मदत घेतली जाणार आहे. तात्पुरत्या उपायाऐवजी कायमस्वरूपी उपाय योजला जात आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

भविष्यात घेणार काळजी : मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या गळतीमुळं मुख्य संरचनेवर कोणताही परिणाम झालेला नाही. फक्त सांध्यांमधून पाणी येत आहे. त्यावर उपाय योजना करण्यात येत आहे. पावसाळ्यातही पाणी आत शिरणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. लोकांच्या सुरक्षेकडं बारीक लक्ष दिलं जणार आहे. कामात कोणताही निष्काळजीपणा केला जाणार नाही. आता येथील वाहतूक सुरळीत सुरू असून वाहतुकीला कोणताही अडथळा नाही. तसंच भविष्यात असा प्रकार होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

मला माझी जबाबदारी महत्त्वाची : सध्या राज्यात दुष्काळाचं सावट आहे. पाणी, चारा टंचाई आहे. अनेक विपरित घटना घडत आहेत. अशा परिस्थितीत मला राज्यात राहण्याची गरज आहे. मान्सूनपूर्व संदर्भात आज बैठक झाली. पावसाला लवकरच सुरुवात होईल. हवामान खात्यानं सांगितलं की, यंदा भरपूर पाऊस पडणार असून लोकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी बैठकांचं सत्रही सुरू आहे. त्यामुळं कोण काय करतो, यापेक्षा माझं काम, माझ्या जबाबदाऱ्या माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत, असं शिंदे म्हणाले.

हे वाचलंत का :

  1. EXCLUSIVE: "...म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी रस्त्यावर"; 'ईटीव्ही भारत'च्या मुलाखतीत विरोधकांच्या दाव्याला मुख्यमंत्र्यांचं रोखठोक उत्तर - CM Eknath Shinde Interview
  2. शरद पवारांच्या 'लेडी जेम्स बाँड'ची सुप्रिया सुळेंवर टीका; म्हणाल्या, 'सुळेंमुळं..." - Sonia Duhan On Supriya Sule
  3. 'मला मृत्यूचा व्यापारी, घाणेरड्या नाल्यातला किडा...; पंतप्रधान मोदी विरोधकांवर संतापले! - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.