ETV Bharat / state

छत्रपती शिवरायांचा जयघोष इंग्लंडमध्ये! लंडनच्या आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटरमध्ये उभारणार शिवस्मारक - आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटर

Shivaji Maharaj memorial - महाराष्ट्रासाठी मोठ्या अभिमानाने मिरवावं अशी बातमी समोर आली आहे. आता लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचं स्मारक उभारण्यात येणार आहे. याबाबत महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून याबाबत मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे यांच्यात अनेक विषयांवर चर्चा झाली.

लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 16, 2024, 5:25 PM IST

मुंबई Shivaji Maharaj memorial : महाराष्ट्रासाठी एक अभिनामास्पद बातमी समोर आलीय. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला जाणार आहे. लंडन आणि महाराष्ट्र यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी यांनी गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव : लॉर्ड मेयर ऑफ लंडन मायकल मिलेनी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत मिलेनी यांनी लंडनमधील आर्टीफिशिअल इंटेलिजन्स सेंटरला 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचं नाव देण्याची इच्छा व्यक्त केली. मिलेनी यांच्या सकारात्मक भूमिकेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केलं आहे. तसंच, लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा अशी देखील मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यालाही तत्काळ मिलेनी यांनी प्रतिसाद दिला.

अटल सेतूचा प्रवास भन्नाट : महाराष्ट्र आणि लंडनमधील संबंध चांगले असून ते यापेक्षा अधिक वृद्धींगत होण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मुंबई कोस्टल रोड, अटलसेतू सारखे पायाभूत सुविधांचे प्रकल्प गेमचेंजर ठरणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी अटल सेतूवरचा प्रवास भन्नाट होता असा अनुभव कथन करतानाच, अटल सेतू भव्य आणि दर्जेदार असल्याचं मिलेनी यांनी सांगितलं. तसंच, महाराष्ट्र राज्य हे गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय असून, येथे मोठा वाव आहे. भव्य पायाभूत सुविधा, कुशल मनुष्यबळ आणि उद्योगासाठी पोषक वातावरण असल्यानं उद्योजकांनी महाराष्ट्राला पसंती दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितलं आहे.

शौर्य आणि पराक्रमाची गाथा प्रेरणादायी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा प्रेरणादायी आहे. महाराजांचं विविध क्षेत्रातील काम आदर्श घेण्यासारखं आहे. लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देतानाच लंडनमधील आर्टीफिशिअल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्याचा मानस मिलेनी यांनी यावेळी व्यक्त केला. वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीस ब्रिटीश उपउच्चायुक्त हरजिंदर कांग, हेन्री ली, अभिजीत देशपांडे असे मान्यवर उपस्थित होते. यावेळी पर्यावरण, स्वच्छ हवा, आर्टीफिशिअल इंटेलिजन्स, माहिती तंत्रज्ञान याबाबत सविस्तर चर्चा झाली आहे.

हेही वाचा :

1 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर घणाघात! दहा वर्षांपूर्वी फक्त घोटाळ्यांची चर्चा, आता फक्त विकास

2 आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा हृदयविकारानं मृत्यू, शंभू सीमेवरील दुर्दैवी घटना

3 लोणावळ्यात काँग्रेसचे प्रशिक्षण शिबिर सुरू; पक्षाचे दिग्गज नेते करणार मार्गदर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.