कोल्हापूर Chhatrapati Sambhaji Raje : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशपातळीवर आकाराला आलेली 'इंडिया' आघाडी भाजपासमोर आव्हान उभं करत आहे. त्यातच राज्यातील महाविकास आघाडीकडून माजी खासदार संभाजीराजेंना कोल्हापूर लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. संभाजी राजेंना महाविकास आघाडीतून उमेदवारी द्यावी, असा असा मतप्रवाह तयार होत आहे. स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी राजेंनी मात्र, स्वराज्य पक्षातूनच निवडणूक लढवणार असल्याचा निश्चय केला आहे. त्यामुळं महाविकास आघाडीची अडचण निर्माण झाली आहे. याबाबत संभाजी राजेंनी 'X' या सोशल मीडियावर पोस्ट केलं
- कोणत्याही पक्षात जाणार नाही : छत्रपती संभाजीराजे कोणत्याही पक्षात जाणार नसून, त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. संभाजीराजे स्वराज्य पक्षातच राहणार असले, तरी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. स्वराज्य पक्ष महाविकास आघाडीचा घटक बनू शकतो, असं त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.
स्वराज्य पक्षाची वाटचाल सुरूच : स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचं भविष्य स्वराज्य असेल. या ध्येयानं माझी स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे, असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काँग्रेसबरोबर बोलणी : छत्रपती शिवाजी महाराज तसंच राजर्षी शाहू महाराज यांच्या घराण्याचे वंशज असलेले संभाजीराजे राज्यसभेचे माजी खासदार आहेत. त्यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाशी बोलणी सुरू असल्याचं स्पष्ट केलं होतं. मराठा आरक्षण, छत्रपती शिवरायांचे राज्यभरातील गडकिल्ले संवर्धनाच्या कामामुळं त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळाली होती. त्यामुळं लोकसभेसाठी संभाजीराजेना उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय. मात्र, संभाजीराजेंनी स्वराज्य पक्षातूनच निवडणुक लढवणार असल्याचं स्पष्ट केल्यांना महाविकास आघाडीची अडचण झाली आहे.
हे वाचलंत का :