ETV Bharat / state

कर्नाटकातून शिर्डीला जाणाऱ्या खासगी बसची बिअरच्या कंटेनरला धडक, 18 जण जखमी, 4 गंभीर - chhatrapati sambhaji nagar accident - CHHATRAPATI SAMBHAJI NAGAR ACCIDENT

शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या खासगी बसचा पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ढोरेगाव शिवारात अपघात झाला. हा अपघात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारस घडला.

chhatrapati sambhaji nagar accident
छत्रपती संभाजीनगर अपघात (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 22, 2024, 10:57 AM IST

Updated : May 22, 2024, 12:22 PM IST

भाविकांच्या बसचा अपघात (Source- ETV Bharat Reporter)

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) - कर्नाटकातून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी भाविक घेऊन जाणाऱ्या खासगी बस आणि कंटेनरचा अपघात झाला. हा अपघात मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास झाला. खासगी बसमध्ये जवळपास 60 भाविक होते. यात चालकांसह 18 जण जखमी झाले आहेत. यामध्ये 4 जण गंभीर जखमी आहेत. त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील ढोरेगाव शिवारात घडली.

मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास कर्नाटक येथून दर्शनासाठी 60 भाविकांना घेऊन खासगी बस शिर्डीच्या दिशेने येत होती. बिअरनं भरलेला कंटेनर गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव शिवारात असणाऱ्या सीएनजी पंप समोर वळण घेत होता. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सनं त्या कंटेनरला जोरदार धडक दिली. अपघात इतका भयंकर होता की, कर्नाटक ट्रॅव्हल्सचा समोरील भागा पूर्ण चकणाचूर झाला. सुदैवानं अपघातामध्ये जीवितहानी टळली.

स्थानिकांच्या मदतीने बचावकार्य- ट्रॅव्हल्स बसने कंटेनरला जोरात धडक दिल्यानं मोठा आवाज झाला. स्थानिकांनी ग्रामीण पोलिसांना अपघाताबाबत माहिती देत तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. स्थानिकांनी सर्व भाविकांना बसमधून बाहेर काढलं. त्यात जखमी झालेल्या सर्व भाविकांना शहरातील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आलं. या घटनेमध्ये बसचे खूप मोठे नुकसान झालं आहे. रुग्णांवर उपचार करून किरकोळ जखमी असलेल्यांना लगेच सोडण्यात आलं. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. पुढील तपास गंगापूर पोलीस करत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली.

हेही वाचा-

  1. पुणे हिट अँड रन प्रकरण : पोर्शो कार नोंदणी न करताच रस्त्यावर, 40 लाखांचा टॅक्स नुसता भरणं आहे बाकी - Pune Hit and Run Case
  2. फिरण्यासाठी गेलेल्या मुलांचा पाण्याचा अंदाज चुकला, पाच जणांचा भावली धरणात बुडून मृत्यू - Nashik drowning incident
  3. मुख्यमंत्र्यांनी अपघातग्रस्तांना केली मदत; रस्त्यावर उतरून जखमींना पाठवलं रुग्णालयात - CM Shinde Helped Injured

Last Updated : May 22, 2024, 12:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.