पुणे Golden Temple Replica Controversy : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीनं यंदा अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत होती. मात्र, शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीनं (SGPC) याला विरोध केल्यामुळं आता या मंडळाकडून अमृतसर येथील दुर्ग्याणा मंदिराचा देखावा साकारण्यात येणार आहे.
नेमकं प्रकरण काय? : अमृतसर येथील शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे (SGPC) अध्यक्ष हरजिंदर सिंग धामी यांनी एक्सवर पोस्ट करत हे शीखांच्या भावना भडकवणारं कृत्य असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आज (6 सप्टेंबर) शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या शिष्टमंडळानं या देखाव्याची पाहणी केली. पाहणीनंतर देखाव्याला मंडळाकडून सुवर्ण मंदिराऐवजी अमृतसर येथील 'दुर्ग्याणा मंदिर' असं नाव देण्यात आलंय.
दोन्ही मंदिरं सारखेच : अमृतसर येथील सुवर्ण मंदिर तसंच शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या शिष्टमंडळानं आज छत्रपती राजाराम मंडळ येथे भेट देऊन देखाव्याची पाहणी केल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर यांनी सांगितलं की, "यावर्षी आम्ही अमृतसर येथील सुवर्ण मंदिराचा देखावा तयार करणार होतो. पण यात काही गोष्टी अडचणीच्या आल्या आणि आज त्यांच्या शिष्टमंडळाकडून काही सूचना करण्यात आल्या. त्यांनी अमृतसर येथील दुर्ग्याणा मंदिर असं देखाव्याला नाव द्यावं असं सांगितलंय. त्यानुसार आता आम्ही देखील देखाव्याचं नाव बदललंय. शीख बांधवांच्या भावना दुखाव्यात, असं उद्दिष्ट आमचं अजिबात नव्हतं. असा विचार देखील आम्ही कधी केला नव्हता. तरीही त्यांनी ज्या सूचना केल्यात त्याचं आम्ही पालन केलंय," असं युवराज निंबाळकर म्हणाले.
हेही वाचा -