ETV Bharat / state

घोटभर पाण्यासाठी आदिवासींची भटकंती, स्वातंत्र्यानंतरही चौराकुंड गावातील ग्रामस्थांचा पाण्यासाठी संघर्ष - Tribal Struggle For Water - TRIBAL STRUGGLE FOR WATER

Tribal Struggle For Water : मेळघाटातील चौराकुंड गावात घोटभर पाण्यासाठी आदिवाशांना भटकंती करावी लागतेय. स्वातंत्र्यानंतरही मेळघाता पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणे आहे.

Tribal struggle for water
जीव धोक्यात घालून पाणी काढताना गावकरी (ETV BHARAT Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 9:10 PM IST

अमरावती Tribal Struggle For Water : प्रातःविधीपासून सकाळचा चहा, स्वयंपाक, धुणी-भांडी तसंच तहान भागवण्यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी पावसाळ्यात देखील गावकऱ्यांना धावपळ करावी लागत असल्याचं चित्र आहे. गावापासून दीड दोन किलोमीटर अंतरावर पायपीट करत महिलांसह लहान मुलं, माणसांची विहिरीवर पाण्यासाठी गर्दी होतोय. त्यामुळं पाय घसरून विहिरीत पडण्याचा धोका देखील निर्माण झालाय. देशात स्वातंत्र्याची 77 वर्ष उलटल्यानंतर देखील आमच्या माऊल्यांना पाण्यासाठी वनवन भटकत फिरावं लागत असल्याचं चित्र मेळघाटात पहायलपा मिळतंय. मात्र, याची जाणीव राजकीय नेते, सामाजीक संघटना, तसंच सुक्षशीत समाजाला नसल्याची खंत आदिवासी बांधवांकडून व्यक्त होत आहे.

सुरेश सावलकर, संगीता धांडे यांच्या प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

आदिवासींना पाणीटंचाईचा फटका : उन्हाळ्यात पाणीटंचाई देशभरात अनेक ठिकाणी पहायला मिळते, मात्र उन्हाळाच नव्हे, तर हिवाळा, पावसाळ्यात देखील अनेकांना पाण्याची समस्या भेडसावतेय. मेळघाटातील आदिवासींच्या अनेक पिढ्यांना या पाणी टंचाईचा फटका बसतोय. धारणी तालुक्यात येणाऱ्या चौराकुंड या अतिदुर्गम भागात पाण्यासाठी धावपळ करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या असाह्य वेदना, अडचणी समस्या 'ईटीव्ही भारत' नं जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय. गावातील महिला, युवती इतकच नव्हे, तर लहान मुलांना देखील पाण्यासाठी धावपळ करावी लागतेय. खरंतर या भागात पाणीटंचाईच्या झळा वर्षानुवर्षे तशाच आहेत.

स्वातंत्र्यानंतरही पाण्यासाठी संघर्ष : परतवाडा ते धारणी मार्गावर हरीसाल गावापासून उजव्या बाजूला जंगलात 11 किलोमीटर आतमध्ये 1 हजार वस्तीचं चौराकुंड गाव आहे. या गावात पहाटे दिवस उजाडताच प्रत्येक घरातील महिला, लहान मुलं, वृद्धाची पाण्यासाठी धावपळ सुरू होते. गावापासून दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या जांगरू बेठेकर यांच्या शेतातील विहिरीवर सर्वच गावकऱ्याची पाण्यासाठी जत्रा भरते. विहरीतून हातानं पाणी काढल्यानंतर गावात पोहचवण्यासाठी सर्वांचा अनेक फेऱ्या माराव्या लागतात. त्यानंतर एका दिवसाचं पाणी प्रत्येकाच्या घरी साठतं. तसंच ज्यांच्याकडं दुचाकी, बैलगाडीती साधन आहेत त्यांना पाण्याची वाहतूक करणं सोप जातं. मात्र, ज्यांच्याकडं वाहतूकीची साधनं नाहीत, अशांना अनेक तासांची पायपीट करावी लागते. त्यामुळं आयुष्यभर जावाशी खेळून मेळघाटातील आदिवासांना घोटभर पाणी मिळंत.

ग्रामस्थांचा शासन, प्रशासनावर रोष : गावात नवीन पाईपलाईनचं काम सुरू आहे. त्यामुळं प्रत्येक घरात नळ येतील, असं पोकळ अश्वासनं नेहमीच राजकीय नेते देतात. मात्र वास्तवात गावात कुठेच पाईपलाईन दिसंत नाहीय. एक, दोन ठिकाणी नावापुरते नळ बसवण्यात आले आहेत. शासन, प्रशासनातील मंडळी केवळ आमची फसवणूक करीत असल्याचा रोष चौराकुंड येथील ग्रामस्थांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलाय. आमचं गाव मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येत. त्यामुळं या भागात अनेक कामांना अडचणी येत आहेत. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तरी पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ग्रामस्थांच्या पाठीशी उभं राहायला हवं, अशी अपेक्षा चौराकुंड येथील रहिवासी सुरेश सावलकर या युवकानं 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केलीय.

प्यायला पाणी गढूळ : शासनाच्या वतीनं चौराकुंड गावात एक विहीर खोदण्यात आलीय. पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं या विहिरीवरून गावात पाणीपुरवठ्याची सुविधा अद्यापही सुरू करण्यात आलेली नाहीय. गंभीर बाब म्हणजे या सरकारी विहिरीचं पाणी अतिशय गढूळ आहे. या विहिरीतलं पाणी पिण्यासाठीच नव्हे, तर वापरण्यासाठी देखील योग्य नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. जागरु बेठेकर यांच्या शेतातील विहिरीचं पाणी शासनाच्या विहिरीपेक्षा किंचित बरं असलं, तरी हे पाणी देखील गढूळ आहे. कुठल्याही पर्याय नसल्यामुळं चौराकुंड येथील आदिवासी बांधवांना गढूळ पाणी पिऊनच आपली तहान भागवावी लागतेय.

पावसाळ्यात पाणी भरणं कठीण : उन्हाळ्यात रखरखत्या उन्हात गावातील महिला, चिमुकले विहिरीवर पाणी भरण्यासाठी येतात. उन्हाळ्यात पाणी भरण्यापेक्षा पावसाळ्यात पाणी भरणं कठीण असल्याचं गावकऱ्यांचं म्हणणे आहे. पावसाळ्यात चिखल तुडवत पाणी भरावं लागतं. त्यामुळं अनेक वेळा महिला, लहान मुलं पाय घसरून पडतात. मुसळधार पावसात पाणी काढतांना विहरीत पडण्याची शक्यता दाट असते, असं संगीता धांडे यांनी सांगितलंय. पाणी भरायला फार त्रास होतो घरापासून फार लांब यावं लागतं.

हर घर नल योजना नावापूर्ती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर नल योजना जाहीर केलीय. या योजनेअंतर्गत गावात पाईपलाईनचं काम झालेलं नाहीय. त्यामुळं नळाचा कुठंच पत्ता नाहीय. गावात हर घर जल योजना आली असती, तर ग्रामस्थांना इतक्या दूर विहिरीवर कशी गर्दी झाली असती, असं सुरेश सावलकर म्हणाले.

गावात विजेचीही बोंब : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या अतिदुर्गम चौराकुंड या गावांमध्ये वीज देखील पोहोचली नाहीय. गावात वीज असली, तरी ती आठ पंधरा दिवसातून एखाद्या दिवशी दीड दोन तासांसाठी कशीबशी येते. महिन्यातून एखाद्याच दिवशी विजेचा मुक्काम सात आठ तास राहतो. अन्यथा गावात विजेची बोंबाबोंबच आहे. आता पावसाळा सुरू झाल्यामुळं पावसाळा संपेपर्यंत विजेचं काही सांगता येत नाही, असं ग्रामस्थांनी सांगितलंय.

'हे' वाचलंत का :

  1. इंग्रजी येत नसल्यानं सुजय विखेंनी उडवली खिल्ली; शरद पवारांच्या 'या' पठ्ठ्यानं इंग्रजीत घेतली 'खासदारकी'ची शपथ - Nilesh Lanke Oath In English
  2. केजरीवाल राहणार तुरुंगातच, दिल्ली उच्च न्यायालयाचा जामीन देण्यास नकार - Arvind Kejriwal Bail Plea
  3. मध्यप्रदेशातील 'लाडली बहना' आता महाराष्ट्रात; महायुतीला ठरणार का तारणहार ? - Ladki Bahin Yojana

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.