ETV Bharat / state

पुण्यात पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं वाहतुकीत बदल, वाहतूक पोलिसांनी दिली माहिती - Pune Traffic Changes - PUNE TRAFFIC CHANGES

Pune Traffic Changes : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी उद्या पुण्यातून प्रस्थान करणार आहे. या अनुषंगाने पुण्यातील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील आणि पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग रोहिदास पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

Pune Traffic Changes
वाहतुक व्यवस्थेत बदल (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 10:10 PM IST

पुणे Pune Traffic Changes : काल देहूहून संत तुकाराम महाराज तर आज आळंदीहून संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे प्रस्थान झाले तर उद्या ही पालखी पुणे शहरामध्ये दाखल होणार आहे. ही पालखी आज (29 जून) पुणे शहरात मुक्कामी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आलेले आहेत. तसेच वाहतूक विभागाकडून काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील आणि पोलीस उपायुक्त वाहतूक विभाग रोहिदास पवार यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

पुण्यातील वाहतुक बदलाविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी (ETV Bharat Reporter)

पोलिसांकडून वाहतूक बदलाच्या सूचना : पुण्यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी आगमन आणि मुक्कामाच्या दिवशी मोठी वाहतूक कोंडी होते. या पालखी सोहळ्या दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे वाहतूक पोलिसांनी गूगल मॅप सोबत तसेच गूगल मॅपवर नागरिकांना वाहतूक बदल कळवण्यात येणार आहेत. यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांना मदत होणार असल्याचं यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं आहे. तसेच या सोबत संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी आगमन आणि मुक्काम वेळी वाहने चालवणे टाळण्याचे आवाहन अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी केले आहे. या सोबत वाहतूक बदलाच्या सूचना पुणे पोलिसांच्या विविध समाज माध्यमावरून दिल्या जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं.

वारकऱ्यांच्या सुविधेसाठी आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध : पालखीच्या काळात पालखीचा मार्ग, बंद करण्यात आलेले रस्ते तसेच वाहतुकीतील करण्यात आलेले बदलांची अचूक माहिती वाहन चालकांना मिळण्यासाठी पुणे शहर आयुक्तालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून गुगल लिंक तयार करण्यात आली आहे. याचा वापर करून नागरिकांना कोणकोणते रस्ते खुले आहे कोणते रस्ते बंद आहे हे पाहता येणार आहे.

हेही वाचा:

  1. "अतिरिक्त अर्थसंकल्पाला मान्यता नसताना जीआर काढणे हक्कभंग’’, वडेट्टीवारांचा सरकारवर गंभीर आरोप - Maharashtra Assembly Session 2024
  2. पुण्यात आढळला झिकाचा चौथा रुग्ण, महापालिकेचा आरोग्य विभाग लागला कामाला - Zika Virus In Pune
  3. मुंबई-नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य : वाहनांच्या लांबच लांब रांगा, मुख्यमंत्र्यांचे आदेश कागदावरच - Traffic on Mumbai Nashik highway

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.