ETV Bharat / state

चंद्रपूर मनपाची 24 कोटींची वादग्रस्त निविदा अखेर रद्द; आचारसंहितेचा भंग झाल्याची केली होती तक्रार - Chandrapur Municipal Corporation - CHANDRAPUR MUNICIPAL CORPORATION

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिकेनं 18 मार्च रोजी शहरातील रामाळा तलावाच्या पुनर्जीवनाची 24 कोटीच्या नव्या कामाची निविदा प्रसिद्ध केली. मात्र याप्रकरणी मनपाचे माजी नगरसेवक तथा जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. नंतर ही निविदा रद्द करण्यात आलीय.

चंद्रपूर मनपाची 24 कोटींची वादग्रस्त निविदा अखेर रद्द; आचारसंहितेचा भंग झाल्याची केली होती तक्रार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 8:53 AM IST

चंद्रपूर Chandrapur Municipal Corporation : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 16 मार्चला आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर चंद्रपूर महानगरपालिकेनं 18 मार्च रोजी शहरातील रामाळा तलावाच्या पुनर्जीवनाची 24 कोटीच्या नव्या कामाची निविदा प्रसिद्ध केली. या प्रकरणी चंद्रपूर मनपाचे माजी नगरसेवक तथा जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा तसंच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची लेखी तक्रार केली होती. या तक्रारीनंतर अखेर 26 मार्च रोजी मनपानं ही वादग्रस्त निविदा प्रक्रिया रद्द केलीय.

तक्रारदाराचा आरोप काय : आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवीन कामासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरु केल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची पूर्ण माहिती आयुक्त विपिन पालीवाल यांना आहे. या कामासाठी 540 दिवसांचा कालावधी असतानांही केवळ 8 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करुन मर्जीतील कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा प्रयत्न मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी केल्याचा आरोप तक्रारकर्ते पप्पू देशमुख यांनी केलायय.

निवडणूक निरीक्षक लोकेश कुमार जाटव यांच्याकडं तक्रार : आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर मनपा प्रशासनानं 24 कोटी रुपये किमतीची वादग्रस्त निविदा प्रक्रिया 26 मार्च रोजी रद्द केली. मात्र हेतुपुरस्पर आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे मनपा आयुक्त यांचे विरुध्द आजपर्यंत कोणतीही कठोर कारवाई निवडणूक विभागानं केली नाही. आयुक्त पालीवाल सात वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत असून त्यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याची माहिती निवडणूक विभागाला देण्यात आली. गंभीर तक्रारीनंतरही आयुक्त पालीवाल यांच्याविरुद्ध निवडणूक विभागानं तातडीनं कारवाई का केली नाही ? निवडणूक विभाग मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांना कारवाई पासून सूट देत आहे का ?असा प्रश्न तक्रारदारानं उपस्थित केलाय. याबाबत वन अकादमी इथं आलेले चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे सामान्य निरीक्षक लोकेश कुमार जाटव यांच्या कार्यालयात 29 मार्चला लेखी तक्रार नोंदवली असून निवडणूक विभागानं आयुक्त पालीवाल यांच्याविरुद्ध कठोर कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागणार अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलीय.

हेही वाचा :

  1. असाही योगायोग; प्रतिभा धानोरकर यांना चंद्रपुरातून उमेदवारी; आजच्याच दिवशी बाळू धानोरकर यांना मिळाली होती उमेदवारी - Pratibha Dhanorkar
  2. लोकसभा निवडणूक पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची अधिसूचना जारी, विदर्भातील ५ मतदारसंघात १९ एप्रिलला होणार मतदान

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.