ETV Bharat / state

सख्खा मित्र पक्का वैरी; कुख्यात गुंड हाजी सरवर शेख हत्याकांडात धक्कादायक माहिती आली पुढं, 'या' कारणातून मित्रानंच केला खून - Gangster Haji Sarwar Shaikh Murder - GANGSTER HAJI SARWAR SHAIKH MURDER

Gangster Haji Sarwar Shaikh Murder : कुख्यात गुंड हाजी सरवर शेख हत्याकांड प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आलीय. एकेकाळी मित्र असलेल्या समीर शेख उर्फ प्रमोद वेळाकार यानं पैशाच्या वादावरुन हा खून केल्याची माहिती पुढं आली आहे.

Chandrapur Crime
कुख्यात गुंड हाजी सरवर शेख (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 14, 2024, 8:56 AM IST

चंद्रपूर Gangster Haji Sarwar Shaikh Murder : कुख्यात गुंड हाजी सरवर शेख हत्याकांड प्रकरणी धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एकेकाळी जीवलग मित्र असलेला समीर शेख उर्फ प्रमोद वेळाकार यानं इतर सहकाऱ्यांसह मिळून हाजीची हत्या केली. पैशाच्या वादातून हे हत्याकांड घडल्याचं सांगितलं जात आहे. आतापर्यंत सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून काही आरोपी फरार आहेत. हत्याकांडाची योजना नागपूर आणि दिग्रस इथं तयार करण्यात आली, असं पोलीस तपासात समोर आलं आहे.

धर्मांतर करुन तरुणीशी लग्न : या हत्याकांडात आतापर्यंत समीर सरवर शेख (पूर्वाश्रमीचा प्रमोद वेळोकार उर्फ राजीव यादव रा. दिग्रस), निलेश उर्फ पिंटू ढगे (रा. नागपूर), श्रीकांत अशोक कदम (रा. दिग्रस), प्रशांत उर्फ पस्सी राजेंद्र मोटवाणी (रा. दिग्रस ), राजेश मुलकळवार (वय २५ रा. नकोडा) आणि अन्य एका आरोपीचा समावेश आहे. सहाव्या आरोपींची ओळख अद्याप पोलिसांनी सार्वजनिक केली नाही. समीर सरवर शेखची ओळख हाजीशी सन २००९ मध्ये झाली. दोघांनी मिळून गुन्हेगारी विश्वात दबदबा निर्माण केला. अनेकदा ते दोघं मिळूनच तुरुंगात गेले. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई सुद्धा करण्यात आली. या गुन्हेगारी प्रवासात समीरचे एका मुस्लिम युवतीशी प्रेमसबंध जुळले. तिच्याशी विवाह करण्यासाठी तो प्रमोद वेळोकारचा समीर सरवर शेख झाला. त्यानं धर्मपरिर्वतन केलं. हाजीनं त्याला स्वतःच्या वडिलांचं नाव आणि आडनाव दिलं. मध्यंतरी एका प्रकरणात दोघंही नागपूरच्या कारागृहात होते. हाजी जामीनावर सुटला आणि समीर आत राहिला. तेव्हापासूनच त्या दोघात वैरत्व निर्माण झालं.

पैशाच्या वादातून हत्या : समीरला हाजीच्या एका नाजूक प्रकरणाचा सुगावा लागला. त्यामुळे तो सुडाने पेटून उठला. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्यानं हाजीकडं त्यांच्या वाट्यातील पैशाची मागणी केली. हाजीनं ते देण्यास टाळाटाळ केले. तडजोडीसाठी मध्यंतरी या दोघांची नागपूर इथं एक बैठक सुद्धा झाली. ती निष्फळ ठरली. त्यामुळे नाजूक प्रकरणाचा संताप आणि पैशाची मागणी नाकारल्यानं समीरनं हाजीला कायमचं संपवण्याचं ठरवलं. दुसरीकडं हाजी आपल्यालाच मारणार आहे, अशी माहिती समीरला मिळाली. दरम्यान ११ ऑगस्टला समीर चंद्रपुरात आला. तत्पूर्वी हाजीला संपवण्याची योजना दिग्रस इथं तयार केली. त्यानं दिग्रस इथून श्रीकांत अशोक कदम, प्रशांत उर्फ राजेंद्र मोटवाणी, नागपुरातून नामदेव ढगे आणि हाजीच्या नकोडा गावातून राजेश मुलकवार याला सोबत घेतलं. हे सर्व चंद्रपुरातील एका लॅाजमध्ये थांबले. हाजीवर हल्ला होणार असल्याची टीप पोलिसांना आधीच मिळाली. पोलिसांनी मारेकऱ्यांसाठी शोध मोहीम राबवली. परंतु पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याच्या आधीच समीर आणि त्याचे साथीदार हाजीपर्यंत पोहचले.

धारदार शस्त्रामुळे मृत्यू : बिनबा गेट परिसरातील शाही दरबार या हॅाटेलमध्ये हाजी मित्रांसोबत जेवण करत असताना सोमवारला दुपारी त्यांच्यावर बेछुट गोळीबार करण्यात आला. एवढंच नव्हे तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हाजीवर या पाचही जणांनी धारदार शस्त्रानं हल्ला केला. हाजीला चार गोळ्या लागल्या. मात्र, त्याचा मृत्यू धारदार शस्त्रामुळे झाला असल्याचा, वैद्यकीय अहवाल समोर आला आहे. या हल्यानंतर पाचही आरोपींनी स्थानिक गुन्हे शाखेत आत्मसमर्पण केलं. आणखी एका आरोपीला रात्री अटक करण्यात आली. या सर्वांना मंगळवारला न्यायालयात हजर केलं. त्यांना न्यायालयानं चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. या मारेकऱ्यांना शस्त्र पुरवणाऱ्या आणखी दोघांचा पोलीस शोध घेत आहे. आरोपींकडून चार पिस्तूल, चाकू जप्त करण्यात आले. समीर सरवर शेख खापरखेडा इथं राहत असताना राजीव यादव नावानं वावरत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं.

हेही वाचा

  1. 'गँग्ज ऑफ चंद्रपूर'; कुख्यात गुंडाची गोळ्या घालून हत्या, पाच आरोपींना अटक - Chandrapur Crime
  2. राजुऱ्यात फिल्मी स्टाईलनं हत्या; एक वर्षांपूर्वी झाला गोळीबार, आरोपीनं त्याच दिवशी त्याच वेळी घेतला बदला - Rajura Gun Shot Death Case

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.