ETV Bharat / state

NEET पेपर लिक प्रकरण ; चौकशीसाठी सीबीआयचं पथक आज धडकणार लातूरमध्ये - NEET Paper Leak Case

NEET Paper Leak Case : नीट घोटाळ्याचं प्रकरण सीबीआयकडं सोपवण्यात आलं असून आज दिल्लीतून सीबीआयचं पथक लातूरमध्ये दाखल होणार आहे. विशेष म्हणजे आज सकाळीच दहशतवाद विरोदी पथक लातूरमध्ये दाखल झालं आहे.

NEET Paper Leak Case
संग्रहित छायाचित्र (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 29, 2024, 11:04 AM IST

लातूर NEET Paper Leak Case : नीट पेपर लिक प्रकरण सीबीआयकडं हस्तांतरित करण्यात आलं असून आज दिल्ली येथील सीबीआयचं पथक लातूरला दाखल होणार आहे. आरोपी जलील पठाण आणि संजय जाधव या दोघांनीही तपासात पोलिसांना दिलेली माहिती थक्क करणारी आहे. "लातूरमधील मुलं शोधण्यापासून ते परीक्षेपूर्वी त्यांचा फॉर्म भरण्यापूर्वीच गुण वाढवण्याचं षडयंत्र ठरलेलं असे. त्यासाठी 50 हजार रुपयांची टोकन रक्कम मिळताच या मुलांना पुढील सूचना दिल्या जायच्या. फॉर्ममध्ये कोणत्या राज्यातील, कोणत्या शहरातील कोणतं सेंटर निवडायचं, इथपर्यंत नियोजन ठरलेलं असायचं. त्यानंतर लातूर, बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ठराविक परीक्षा केंद्रावर परीक्षेला पाठवलं जायचं."

सीबीआयचं पथक धडकणार लातुरात : "परीक्षा केंद्रावर पेपर फोडून त्यांना मदत केली जायची. त्यासाठी राजस्थान, गुजरात, कर्नाटक, बिहार, उत्तराखंड या राज्यांची निवड केली जायची. विद्यार्थी तिथं नेल्यानंतर पुढील जबाबदारी तिथली टीम स्वीकारायची." ही माहिती कोठडीतील आरोपींनी दिल्यानंतर तपास पथकाला या प्रकरणाची व्याप्ती केवळ महाराष्ट्रात नसून देशभर असल्याचं समोर आलं. त्यामुळं आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करणार असून आज दिल्लीहून सीबीआयचं पथक लातुरात धडकणार आहे.

नीट पेपर लिक प्रकरणाचा तपास सीबीआयकडं : नीट घोटाळ्यातील फरार आरोपी इरान्ना कोंगुलवार आणि दिल्ली येथील गंगाधर हे दोन्ही आरोपी उत्तराखंड, दिल्ली, झारखंड या राज्यात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळं लातूर पोलिसांची पथकं विविध राज्यात पाठवण्यात आली. परंतु आता या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुन्हे अन्वेशन विभाग (CBI) करणार असल्यानं पथकांना परत बोलावण्यात आलं आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

न्यायालयानं सुनावले खडेबोल : न्यायालयानं आरोपी संजय जाधव आणि जलील पठाण यांना दोन जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. परंतु लातूर पोलिसांनी तीन दिवसातच तपास संपवला. आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली. परंतु न्यायालयानं पोलिसांना खडेबोल सुनावताच आरोपींना पुन्हा पोलीस कोठडीत आणण्यात आलं. आरोपी इरान्ना कोंगुलवार फरार असून त्याला अटक करायची आहे, असं तपास अधिकारी भागवत फुंदे यांनी लातूर न्यायालयात सांगितलं. इरान्नाकडून 2 सिमकार्ड असलेला 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त केल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलं. मात्र यावरुन आता पोलिसांच्या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा

  1. संत एकनाथ महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना: पाऊस पडू दे, दुष्काळाचं सावट हटू दे, शेतकऱ्यांची मनोकामना - Ashadhi Wari 2024
  2. समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; स्विफ्ट आणि अर्टिगाची समोरासमोर धडक, 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू - Samruddhi Highway Accident
  3. अर्थसंकल्पात मोफत घोषणांचा पाऊस, पण वस्तुस्थिती काय? - Atul Londhe On Budget 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.