ETV Bharat / state

पत्नीला व्हॉट्सॲपवर दिला तिहेरी तलाक; पती विरोधात गुन्हा दाखल - Triple Talaq - TRIPLE TALAQ

Triple Talaq : व्हॉट्सॲपवर तिहेरी तलाक दिल्याची एक मोठी बातमी समोर आलीय. याप्रकरणी ट्रिपल तलाक देणाऱ्या पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Triple Talaq
ट्रिपल तलाक (ETV BHARAT)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 10:51 PM IST

मुंबई Triple Talaq : दुसऱ्या मुलीशी असलेल्या विवाहबाह्य संबंधांबाबत विचारणा केली असता व्हॉट्सॲपवर "ट्रिपल तलाक" दिला होता. पत्नीच्या तक्रारीवर मालवणी पोलीस ठाण्यात (Malvani Police Station) पती अफनान पटेल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भारतीय दंड संविधान कलम ४९८- अ तसेच ५०४ आणि ५०६ सह मुस्लिम महिला (विवाहाच्या अधिकारचं संरक्षण) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. सहा महिन्यांपूर्वीच या दोघांचा निकाह झाला होता. लग्नानंतरही पती सतत मोबाईलवर दुसऱ्या मुलीशी चॅट करत होता. पत्नीला वेळ देत नसल्यानं पत्नीने त्याचा फोन तपासला असता पतीच बिंग फुटलं.

तलाकची दिली धमकी : अफनान पटेल असं पीडित महिलेच्या पतीचं नाव आहे. लग्न झाल्यानंतर ही एक आठवडा सर्व सुरळीत चालू होत. मात्र पीडित महिलेचा पती महिलेला जास्त वेळ देत नव्हता. तो सतत मोबाईलवर कुणाशी तरी चॅट करत असल्याचं दिसून आलं. एका दिवशी महिलेने पतीचा मोबाईल पाहिला. त्यावेळी एका मुलीबरोबर प्रेमाच्या गोष्टी चॅट करत असल्याचं दिसून आलं. त्यावेळी त्यांचे प्रेम संबंध असल्याचं उघडकीस आलं. याबाबत महिलेने पतीजवळ विचारणा केली असता तिला शिवीगाळ करण्यात आली आणि तलाकची धमकी देण्यात आली.

व्हॉट्सॲपवर केला तलाकचा मेसेज : 16 मे रोजी पीडित महिलेच्या पतीसोबत व्हॉट्सॲपवरून चॅटिंग करत असताना दोघांमध्ये मेसेजद्वारे वाद निर्माण झाला. त्यावेळी महिलेच्या पतीनं त्याला तिच्यासोबत राहायचं नाही असं बोलून त्याला "तलाक तलाक" असा व्हॉट्सॲपवर मेसेज केला. 30 मे रोजी रात्री 10:30 वाजताच्या सुमारास घरातील सर्व मंडळीसमोर महिलेच्या पतीनं कामावरून घरी आल्यानंतर महिलेसोबत विनाकारण वाद घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी तलाकचे पेपर तयार करा आणि येथे राहू नकोस अशी धमकी पतीनं पत्नीला दिली. त्यानंतर पीडित महिलेने सर्व हकीकत आपल्या वडिलांना आणि आजोबांना सांगितली.

पीडित महिलेनं केली तक्रार दाखल : त्यानंतर रात्री 11.45 वाजताच्या सुमारास पीडित महिलेच्या आजोबांनी जोगेश्वरी येथील त्यांच्या घरी महिलेला नेलं आणि 31 मे रोजी वडिलांसोबत मालवणी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. तक्रारीवरून मालवणी पोलीस ठाण्यात पतीविरोधात व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा -

  1. दिल्लीत ट्रिपल तलाकची दोन प्रकरणं उघडकीस, जाणून घ्या मुंबई कनेक्शन काय?
  2. Triple Talaq in Thane : पत्नीला मोबाईलवर कॉल करून पतीनं दिला तिहेरी तलाक; गुन्हा दाखल
  3. Triple Talaq: नवर्‍याने दिला तिहेरी तलाक; हलालाच्या नावावर मेव्हणीबरोबर लग्न, मग काय झाले जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.