ETV Bharat / state

नागपुरातील 11 डॉक्टरांवर निष्काळजीचा ठपका! उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू, गुन्हा दाखल - Nagpur - NAGPUR

Case Registered Against 11 Doctors : उपचारादरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळं रुग्णाचा मृत्यू नागपुरातील 11 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.

case registered against 11 doctors along with the dean of nagpur medical as accused of negligence
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 3:57 PM IST

नागपूर Case Registered Against 11 Doctors : रुग्णाच्या उपचारात निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत न्यायालयाच्या आदेशानं नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील 11 डॉक्टरांवर अजनी पोलीस ठाण्यात कलम 201, 202, 304-अ आणि 34 अन्वये गुन्हा दाखल झाल्यानं वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हे प्रकरण 2019 चं असून तक्रारदारानं, त्याच्या पत्नीचा मृत्यू उपचारात डॉक्टरांनी हयगय केल्यामुळं झाल्याचा आरोप केला होता. तसंच पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर देखील डॉक्टरांनी ही बाब लपवून ठेवली होती, असंही तक्रारदारानं आपल्या तक्रारीत म्हटलंय.

नेमकं प्रकरण काय? : केवलराम पांडुरंग पटोले असं तक्रारदाराचं नाव असून जिल्हा न्यायालयाच्या अधीक्षक पदावरून ते सेवानिवृत्त झाले आहेत. पटोले यांची पत्नी पुष्पा यांच्या मानेवर गाठ होती. उपचारासाठी त्यांनी डॉ. राज गजभिये यांना दाखविले असता त्यांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आणि रुग्णालयात दाखल करून घेतलं. 6 जुलै 2019 ला पुष्पा पटोले यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. मात्र, त्यानंतर त्यांची तब्येत अचानक गंभीर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शस्त्रक्रियेनंतर नातेवाईकांना भेटू सुध्दा दिलं नाही. त्यानंतर तब्बल दोन दिवसानंतर देखील डॉक्टर पुष्पा यांच्या प्रकृतीबद्दल काहीचं सांगत नसल्यानं केवलराम पटोले यांनी 8 जुलै ला पत्नीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी तयारी केली. तेव्हा पुष्पा यांचा मृत्यू झाला असल्याचं त्यांना सांगण्यात आलं. शस्त्रक्रियेदरम्यान पुष्पा यांचा मृत्यू झाला होता. मात्र, आपला निष्काळजीपणा लपवण्यासाठी डॉक्टरांनी त्याच्या मृत्यूची बाब लपवली आणि जाणीवपूर्वक शवविच्छेदन सुद्धा होऊ दिलं नाही, असा आरोप केवलराम पटोले यांनी केला होता.

समितीच्या अहवालात डॉक्टरांवर ठपका : केवलराम पांडुरंग पटोले यांनी सर्वात आधी या प्रकरणाची नागपूरच्या अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.त्यावर पाच डॉक्टरांची एक समिती गठीत झाली. त्या समितीने पुष्पा यांचा मृत्यू कार्डिअक अरेस्टने झाल्याचा अहवालात दिला.मात्र,पटोले यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना अहवालाचे पुनरावलोकन करण्याचा अर्ज केला होता. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकांनी पुन्हा पाच डॉक्टरांची समिती नेमली व सगळ्या संपूर्ण कागदपत्रांची तपासणी केली. रुग्णाची काळजी घेण्यात निष्काळजीपणा झाला होता असे समितीने अहवालात नमूद केले होते.

न्यायालयात मागितली दाद : केवलराम पटोले यांनी या प्रकरणी न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारींनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये यांच्यासह 11 डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरांमध्ये डॉ. भुपेश तिरपुडे, डॉ. हेमंत भनारकर, डॉ. वासुदेव बारसागडे, डॉ. अपुर्वा आनंद, डॉ. सुश्मिता सुमेर, डॉ. विक्रांत अकुलवार, डॉ. गायत्री देशपांडे, डॉ. गिरीश कोडापे, डॉ. विधेय तिरपुडे आणि डॉ. गणेश खरकाटे यांचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. सातशेहून अधिक बेपत्ता नागरिकांचा उषा कोंडलकरांनी घेतला शोध - Nagpur City Police Usha Kondhalkar
  2. पत्नीनं थंड भाजी वाढल्यानं पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचले प्राण - Napgur Police
  3. अत्याचाराच्या घटनेनं नागपूर हादरलं : सामोसे कारागीराचा दोन चिमुकल्यांवर तर बालकाचा चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार - Minor Girls Raped In Nagpur

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.